• Home
  • इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसची धरणे आंदोलन*. _मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा_

इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसची धरणे आंदोलन*. _मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा_

*इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसची धरणे आंदोलन*.

_मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा_

केंद्र सरकारने केलेल्या अन्याय कारक इंधन दरवाढीच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी यांचे वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सद्ध्या देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्यातमधे आणखी एका संकटाला जनतेला सामोरं जावं लागतं आहे.
केंद्र सरकारने सातत्याने इंधन दरवाढ करून जनतेच्या भावनां दुखावल्या आहेत. यावेळी पालक मंत्री सतेज पाटील, आमदार राजूबाबा आवळे साहेब, आमदार चंद्रकांत जाधव साहेब, को.म.न.पा.महापौर आजरेकर मॅडम, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, हातकणंगले तालुका अध्यक्ष भगवान जाधव तसेच सर्व तालुका अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी आमदार राजूबाबा आवळे, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर आजरेकर मॅडम व मान्यवर नेत्यांच्या हस्ते कलेक्टर देसाई साहेबाना इंधन दर वाढी बाबतच्या लोक भावना सरकारला कळविणे बाबत निवेदन देण्यात आले.

anews Banner

Leave A Comment