**वीस हजार नागरिकांना भारतात रोजगार*!!!!!!!*✍️(●राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज●)
जगातील सर्वात मोठी कंपनी असलेली ऍमेझॉन कोरोनाच्या संकटातही 20,000 लोकांना रोजगार देणार आहे. आमच्या ग्राहक सेवा संघात सुमारे 20,000 हंगामी किंवा तात्पुरत्या रोजगाराच्या संधी निर्माण करीत आहोत, अशी माहिती अॅमेझॉन इंडियाने दिली आहे.
यामागील कंपनीचे उद्दिष्ट भारतातील आणि जगभरातील ग्राहकांना मदत करणे हा आहे. ऍमेझॉन इंडियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुढील महिन्यांत ग्राहकांच्या वाहतुकीची अपेक्षित मागणी पूर्ण करण्यासाठी हैदराबाद, पुणे, कोईंबतूर, नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदीगड, मंगलोर, इंदूर, भोपाळ आणि लखनऊ येथे नवीन पदं भरली जातील.ऍमेझॉनद्वारे नवीन तात्पुरत्या पदांच्या भरतीसाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा. तसेच तो इंग्रजी, हिंदी, तमीळ, तेलुगू किंवा कन्नड भाषेत पारंगत असावा.
कंपनीचे म्हणणे आहे की, यापैकी काही तात्पुरती पदं उमेदवारांच्या कामगिरी आणि व्यवसायाच्या आवश्यकतेनुसार वर्षाच्या अखेरीस कायमस्वरूपी केली जाऊ शकतात.
ज्यांना या हंगामातील नोकरीसाठी अर्ज करायचा आहे ते ●1800-208-9900● वर कॉल करू शकतात किंवा seasonalhiringindia@amazon.comवर ईमेल पाठवू शकतात.
Home Breaking News *वीस हजार नागरिकांना भारतात रोजगार*!!!!!!!*✍️(●राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज●)