Home नांदेड मुखेड येथील वंटेकर दांपत्याचे “सेट” परिक्षेत उल्लेखनीय यश पती-पत्नी एकाचवेळी सेट परिक्षा...

मुखेड येथील वंटेकर दांपत्याचे “सेट” परिक्षेत उल्लेखनीय यश पती-पत्नी एकाचवेळी सेट परिक्षा उतीर्ण

157
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड येथील वंटेकर दांपत्याचे “सेट” परिक्षेत उल्लेखनीय यश

पती-पत्नी एकाचवेळी सेट परिक्षा उतीर्ण

नांदेड / मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

यूजीसी व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या मार्फत Assistant professor पदावर जॉइनींग साठी घेतल्या जाणाऱ्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन सदरील निकालात मुखेड शहरातील झेप कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी प्रिय शिक्षक महेश वंटेकर हे लाइफ सायन्स तर त्यांच्या पत्नी सौ.सोनम महेश वंटेकर यांनी एज्युकेशन या विषयातून एकाचवेळी सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन एक नवीन इतिहास रचला कदाचित ही पहीलीच घटना असेल जिथे पती पत्नी एकदाच सेट परीक्षा उत्तीर्ण झाले.
झेप क्लासेसच्या माध्यमातून शैक्षणीक क्षेत्रात ठसा उमटवणारे महेश वंटेकर यांच शालेय शिक्षण मुखेड शहरातील गुरुदेव विद्या मंदिर येथे तर अकरावी व बारावीचे महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालय लातूर व बिएस्सी व एमएस्सी यशवंत महाविद्यालय नांदेड येथे पुर्ण झाले ते एसबीआय बँँकेतील निवृृत कॅशियर माधवराव वंटेकर यांचे चिरंजीव आहेत त्याचबरोबर सौ. सोनम महेश वंटेकर यांच शालेय शिक्षण लातूर येथे तर इंजिनिअरिंग नांदेडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग येथुन पुर्ण झाल त्यानंतर त्यांनी कार्लोक्स टिचर युनिव्हर्सिटी येथुन एम.ए.एज्युकेशन ची डिग्री मिळवली सोनम यांचे वडील एल.आर.कांबळे (कोळी) हे पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.श्री व सौ वंंटेकर यांनी सेट परिक्षेत घवघवीत यश प्राप्त कल्याबद्दल सर्व विद्यार्थी पालक, शिक्षक, मित्रपरिवार व विविध संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यासह सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleगोंडवाना विद्यापीठात साजरा होणार कर्मचाऱ्यांचा क्रिडा महोत्सव महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचारी होणार सहभागी
Next articleरुग्णांनी ताण- तणाव निवारण शिबिरांचा लाभ घ्यावे – डॉ. तहाडे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here