Home विदर्भ गोंडवाना विद्यापीठात साजरा होणार कर्मचाऱ्यांचा क्रिडा महोत्सव महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचारी...

गोंडवाना विद्यापीठात साजरा होणार कर्मचाऱ्यांचा क्रिडा महोत्सव महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचारी होणार सहभागी

134
0

राजेंद्र पाटील राऊत

गोंडवाना विद्यापीठात साजरा होणार कर्मचाऱ्यांचा क्रिडा महोत्सव

महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचारी होणार सहभागी

(विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे सचिव श्री. सतीश पडोळे यांनी दिली माहिती)

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नीत महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे उद्देशाने क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे असा गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटना तसेच चंद्रपूर – गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे यांचेकडे प्रस्ताव सादर केलेला होता त्यास कुलगुरू डॉ. बोकारे यांनी हिरवी झेंडी दिली असुन २६ आणि २७ फेब्रुवारी २०२२ रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या परीसरात हा क्रिडा महोत्सव साजरा होणार आहे.

चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना आणि गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्यापीठाचे कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे आणि प्र-कुलगुरू डाँ. श्रीराम कावळे यांना विद्यापीठाशी संलग्नीत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी आणि गोंडवाना विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना चालना देण्याचे उद्देशाने क्रिडा महोत्सवाचे आयोजन करावे. अशी विनंती करण्यात आली होती, महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या विनंती नुसार चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नुकतीच विद्यापीठाच्या सभा कक्षात सभा पार पडली, यावेळी कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डाँ. श्रीराम कावळे यांचेसह विद्यापीठाच्या क्रिडा विभाग प्रमुख डाँ. अनिता लोखंडे, गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, सचिव सतिश पडोळे महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत रंदई, महासचिव अरूण जुनघरे, कार्याध्यक्ष लोमेश दरडे, महासंघ संघटक विनोद चोपावार, महासंघ प्रतिनिधी विशाल गौरकर आदी उपस्थित होते. सभेत झालेल्या चर्चेनुसार कुलगुरू डाँ. प्रशांत बोकारे यांनी २६ आणि २७ फेब्रुवारी २०२२ रोजी क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यास संमती दिली. त्यामूळे येत्या २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या परीसरात विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. आयोजित क्रिडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नियोजनाची पुर्वतयारी सुरू झाली असुन विविध महाविद्यालयातील २०० आणि विद्यापीठातील १५० असे जवळपास ३५० शिक्षकेत्तर कर्मचारी विविध खेळ आणि सांस्कृतिक कलेचे सादरीकरण करणार आहेत. विद्यापीठ संलग्नीत महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या क्रिडा महोत्सवाचे आयोजन करणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातले पहीलेच विद्यापीठ ठरल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या क्रिडा महोत्सवात कर्मचारी बंधु भगिनींनी मोठ्या संख्येनी उस्फुर्त सहभागी व्हावे. असे आवाहन दोन्ही संघटनेच्या पदाधिका-यांनी केले आहे.

Previous articleमहात्मा गांधी व्यक्ती नसून शांती, अहिंसा आणि त्यागाची शिकवन देणारी विचारधारा जिल्हा काँग्रेस च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीना अभिवादन भजन व प्रभातफेरी काढून दिला शांती चा संदेश
Next articleमुखेड येथील वंटेकर दांपत्याचे “सेट” परिक्षेत उल्लेखनीय यश पती-पत्नी एकाचवेळी सेट परिक्षा उतीर्ण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here