Home सोलापूर टेंभुर्णीतील सर्व जि.प.शाळा झाल्या आधुनिक प्राथमिक सुविधांनी परिपूर्ण….

टेंभुर्णीतील सर्व जि.प.शाळा झाल्या आधुनिक प्राथमिक सुविधांनी परिपूर्ण….

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240317_083202.jpg

टेंभुर्णीतील सर्व जि.प.शाळा झाल्या आधुनिक प्राथमिक सुविधांनी परिपूर्ण….
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप सोलापूर.

टेंभुर्णी शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळा अनेक वर्षापासून प्राथमिक सुविधांपासून वंचित होत्या. या सर्व शाळांमधून समाजातील सर्व जातीतील गोरगरीब पालकांची मुले शिक्षण घेतात. अनेक शाळांची विजेची बिले थकित असल्यामुळे वीज कनेक्शन बंद करण्यात आले होते… तर अनेक शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. वीज नसल्याने डिजिटल लर्निंग थांबलेले होते.
या सर्व मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व त्यांच्या आरोग्यासाठी टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने अतिशय योग्य व अनुकूल निर्णय घेण्यात आला आहे.ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून सर्व जि. प. शाळांना ३ KW सोलरपॅनल, बॅटरी, इन्व्हर्टर तसेच ताशी २५ लिटर चा R.O. वॉटर प्युरिफायर या वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे व १-२ दिवसामध्ये याची जोडणी पूर्ण करण्यात येणार आहे.
यामुळे सर्व शाळांमधील विजेचा प्रश्न मार्गी लागला असून आता सर्व शाळांमध्ये २४ तास वीज उपलब्ध होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर होत आहेत तसेच यापुढे सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छ व निर्जंतुक पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.ग्रामपंचायत टेंभुर्णी कडून पुरविलेल्या या साधनांचा तेथील शिक्षक वर्ग योग्य वापर करतील व त्यामुळे टेंभुर्णीतील सर्व जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण सुखकर होईल यात आता शंका नाही.येणाऱ्या काळात लवकरच सर्व जिल्हा परिषद शाळांमधील शौचालयांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.

Previous articleव्याहाड खुर्द येथे कलार समाज मेळावा संपन्न
Next articleयूनिटी फाउंडेशन तर्फे नारी शक्ती पुरस्कार २०२४ संपन्न 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here