• Home
  • 🛑 शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात….! मराठा आरक्षणावर का नाही ..? 🛑

🛑 शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात….! मराठा आरक्षणावर का नाही ..? 🛑

🛑 शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात….! मराठा आरक्षणावर का नाही ..? 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕माजी खासदार निलेश राणे यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सवाल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सगळ्या विषयांवर बोलतात, परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल ते अद्याप एक चकार शब्दही बोलले नाहीत. असं का ? असा सवाल राणेंनी केला आहे.

मराठा समाजाला राज्य सरकारनं दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे अंतिम आदेशासाठी पाठवण्यात आलं आहे. त्यावरून मराठा समाजात अस्वस्थता आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरक्षणाला स्थगिती मिळवण्यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे.

मराठा संघटनांनी येत्या २३ सप्टेंबर रोजी कोल्हापूरात गोलमेज परिषदेचं आयोजन केलं आहे. त्यात पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. राज्य सरकार मराठा समाजाच्या सोबत आहे.

न्यायालयात लढाई लढत आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. परंतु पवारांनी यावर अद्याप भाष्य केलं नाही असं निलेश राणे यांचं म्हणणं आहे.

कांदा निर्यातबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर पवारांनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत राणेंनी ट्विट केलं आहे.

त्यांनी लिहलं की, “पवार साहेब सगळ्या विषयांवर बोलतात परंतु अद्याप मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल एक चकार शब्दही काढलेला नाही.

मुस्लिम समाजाच्या सणासाठी पवार साहेबांनी मुंबईत येऊन बैठक घेतली होती.

तशी बैठक मराठा समाजासाठी का घेतली नाही…?” असा सवालही निलेश राणे यांनी केला आहे…..⭕

anews Banner

Leave A Comment