• Home
  • 🛑 पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या -: तिघांवर गुन्हा दाखल 🛑

🛑 पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या -: तिघांवर गुन्हा दाखल 🛑

🛑 पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या -: तिघांवर गुन्हा दाखल 🛑
✍️ पुणे : ( विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕पती-पत्नीतील वादानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यातील पोटगीची रक्कम सामोपचाराने ठरविल्यावर पत्नीसह सासरच्या लोकांकडून ५० लाख रुपयांसाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली.

या प्रकरणी पत्नीसह सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडीनजीक मारुंजीमधील एका बड्या गृहरचना संस्थेत ही घटना घडली आहे.

अभिजित गणेश खर्डे (वय ३८, रा. कोलते पाटील मारुंजी, ता. मुळशी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

त्यानुसार अभिजितची पत्नी नेहा खर्डे (वय ३५), तिचा मामा विश्वास जोशी, तिचे वडील नितीन बकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिजितचे वडील गणेश नथ्थुजी खर्डे (वय ६५) यांनी रविवारी (१ नोव्हेंबर) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा हिने तिचा पती अभिजित याच्यावर कौटुंबिक त्रासाचा (४९८) गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यात त्यांच्यात समझोता होऊन ५० लाख रुपये अभिजितने नेहाला देण्याचे ठरले. त्याप्रमाणे अभिजितने नेहाला २० लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम मिळण्यासाठी नेहा, तिचे मामा आणि वडिलांनी अभिजितला मानसिक त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून अभिजितने ३१ ऑक्टोबरला आत्महत्या केली.

नेहा, तिचे मामा आणि वडिलांनी केलेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक छळाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे अभिजितने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत….⭕

anews Banner

Leave A Comment