• Home
  • 🛑 १ सप्टेंबर नंतर कसा असेल लँकडाऊन…? बुधवारी ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय 🛑

🛑 १ सप्टेंबर नंतर कसा असेल लँकडाऊन…? बुधवारी ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय 🛑

🛑 १ सप्टेंबर नंतर कसा असेल लँकडाऊन…? बुधवारी ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबईः⭕गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोना व्हायरस देशभरात तळं ठोकून आहे. सर्वत्र कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.

कोरोनाचा प्रार्दुभाव कमी व्हावा यासाठी राज्य सरकारनं विविध पातळीवर प्रयत्न केले. त्यातच दुसरीकडे लॉकडाऊनमुळे आर्थिक बाजू आणि उद्योगांवर होत असलेल्या परिणामामुळे गेल्या दोन महिन्यांपासून काही प्रमाणात अटी शिथिल करण्यात आल्या. त्यातच आता ऑगस्ट महिना ही संपत आला आहे.

त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यात लॉकडाऊन कशाप्रकारे असेल अशी विचारणा होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात लॉकडाऊन शिथिल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लॉकडाऊन संदर्भात येत्या बुधवारी मुंबईत महाविकास आघाडी सरकारची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लॉकडाऊन या विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे….🛑

anews Banner

Leave A Comment