Home Breaking News 🛑 मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही :- नवनीत राजांचा आक्रमक इशारा...

🛑 मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही :- नवनीत राजांचा आक्रमक इशारा 🛑

82
0

🛑 मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही :- नवनीत राजांचा आक्रमक इशारा 🛑
✍️ अमरावती 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अमरावती :⭕परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने खाणार काय? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यानंतर अनेक नेत्यांनी दौऱ्यांचा धडाका लावला होता तर परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई व इतर कामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं.

मात्र, सणावाराच्या तोंडावर आर्थिक संकट शेतकऱ्यावर कोसळलं असतानाच झालेल्या नुकसानीचे काही ठिकाणी पंचनामेच होत नसल्यानं रब्बी पिके तरी कसं घेणार? बियाणांचा खर्च कसा उचलणार असे अनेक गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत.

अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोंडअळीग्रस्त कापसाचे झाड जाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. ‘यंदा मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक असणारे सोयाबीनचे पीक संपूर्ण हातातून गेले. यानंतर आता कपाशीवर मोठ्याप्रमाणात बोंड अळी व लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे आता कपाशीचे पीकसुद्धा वाया जात आहे. तेव्हा राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी.’ अशी मागणी नवनीत राणा यांनी केली.

तर, ‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 50 हजार रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जमा करावी, जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही.

अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही’ अशी आक्रमक भूमिका नवनीत राणा यांनी घेतली आहे….⭕

Previous article🛑 पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या -: तिघांवर गुन्हा दाखल 🛑
Next article*……संपादकीय!* *”युज अँण्ड थ्रो”चे वाढते प्रकार* *अनेकांचे संसार करताहेत उध्वस्त*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here