• Home
  • *……संपादकीय!* *”युज अँण्ड थ्रो”चे वाढते प्रकार* *अनेकांचे संसार करताहेत उध्वस्त*

*……संपादकीय!* *”युज अँण्ड थ्रो”चे वाढते प्रकार* *अनेकांचे संसार करताहेत उध्वस्त*

*…..,
आजकाल कोण कोणाच्या मजबुरीचा कसा गैरफायदा घेईल आणि त्यातून एकदा का मतलब साध्य झाले की,मग आपण कोण अन आपल्याला काय देणे घेणे हि प्रवृती सध्या मोठया प्रमाणावर फोफावत चालली आहे.
वासनांध प्रवृतीच्या व्यक्ती असे सावज हेरतच असतात.मग ते कधी आपल्या वयाचा किंवा नात्याचाही विचार करत नाहीत.त्यांना हवा असतो फक्त आपली वासनेची भुक भागविण्यासाठी टाईमपास आधार..अन मग त्यातूनच होतात अनेक संसार उध्वस्त!वास्तविक चांगल्या आणि घरदांज महिला फसविण्यासाठी अशा नराधमांना फक्त निमित लागते ते म्हणजे सदर महिलेच्या घरची आर्थिक परिस्थिती गरीबीची किंवा कमावती व्यक्ती व्यसनाधीन असली म्हणजे या हरामखोर वासनांधाना ती असहाय्य मजबुर महिला म्हणजे आपल्याच बापाची मालमता वाटते.कधीही बिनधास्त तिच्याकडे जाणे,विविध भुलथापा देऊन तिला वश करणे आणि आपली शारीरीक भुक भागली की,त्या महिलेला “युज अँण्ड थ्रो”करून फेकून देणे.अर्थातच त्यावेळी त्या महिलेची मात्र पुर्णता फसवणूक झालेली असते.व तिचा संसारही उध्वस्त झालेला असतो.मात्र वासनेचे भुत सवार झालेल्या निर्लज्ज बेशरम हरामखोरांना त्याचेशी काही एक मतलब नसते.नंतर मात्र अशा महिलांचे जगणे हा समाज मुश्कील करुन टाकतो.पण खरा गुन्हेगार मात्र समाजात उजळ माथ्यानेच साजूक सारखा फिरत असतो.आणि समाजाही अशा तृतीयपंथी औलादीला सन्मानाची वागणूक देतो.हे सगळ बघितल की निश्चितच प्रचंड चीड निर्माण होते.की कुठे चालला आहे समाज…गोरगरीब महिलांचा मजबुरीचा गैरफायदा घेऊन त्यांचे संसार उध्वस्त करण्यापर्यत या वासनांध हरामखोरांमध्ये एवढी हिंमत येते तरी कुठून? अगोदर प्रेमाच्या नावाखाली वासनेचा व्याभिचार करायचा अन नंतर त्या महिलेचे सर्वस्व लुटून झाल्यावर बावनबीर सारखे नामानिराळे व्हायचे.,हि कुठली प्रवृती…मानवतेला शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या या अशा घटना डोळ्यात झणझणीत अंजन घालतात तरी महिलांना फसविण्याचे प्रकार कमी होत नाहीत.”युज अँण्ड थ्रो”ची हि नालायक संस्कृती कधी थांबणार हाच गहन प्रश्न आहे.
मात्र येथे या भुतलावर कुणी कितीही हुशारीच्या बाता मारल्यात तरी केलेल्या पापाची फळ येथेच भोगायची आहेत.किडे पडून सडून सडून अखेर येथेच मरायचे आहे,नेमके हेच गोरगरीब मजबुर महिलांचे घर उध्वस्त करणारे विसरले आहेत हिच मोठी शोकांतिका आहे!

anews Banner

Leave A Comment