• Home
  • 🛑 लवकरच करुन घ्या महत्त्वाची कामे; ऑगस्ट महिन्यात बँकांना १२ दिवस सुट्ट्या 🛑

🛑 लवकरच करुन घ्या महत्त्वाची कामे; ऑगस्ट महिन्यात बँकांना १२ दिवस सुट्ट्या 🛑

🛑 लवकरच करुन घ्या महत्त्वाची कामे; ऑगस्ट महिन्यात बँकांना १२ दिवस सुट्ट्या 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 28 जुलै : ⭕ बँकांची आवश्यक आणि महत्त्वाची कामे असतील तर लवकरच करुन घ्या कारण भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या सुट्ट्यांमुळे ऑगस्ट महिन्यात तब्बल १३ दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत.

येत्या ऑग्सट महिन्यात बँकांना १२ दिवस सुट्ट्या असतील. त्यामुळे बँकांतील कामांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पुढील महिन्यात बकरी ईद, रक्षा बंधन, स्वातंत्र्य दिवस आणि साप्ताहिक सुट्टीचा विचार करता १२ दिवस बँका बंद असतील.

बँकांच्या सुट्ट्यांना बकरी ईदपासून सुरुवात होणार आहे आणि ३१ ऑगस्ट रोजी ओणम सणापर्यंत या अधूनमधून सुट्या येणार आहेत. आरबीआयने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार वेगवेगळ्या राज्यातील सण आणि उत्सवानुसार बँकांच्या सुट्ट्यांचा १२ दिवसांचा कालावधी असणार आहे.

१ ऑगस्ट रोजी बकरी ईद आल्यामुळे त्यादिवशी बँक बंद राहणार आहे. तर ३ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाची सुट्टी असणार आहे. तसेच ८ ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार तर ९ ऑगस्ट रोजी रविवार येत आहे त्यामुळे त्यादिवशी साप्ताहिक सुट्ट्या असणार आहेत. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी श्री कृष्ण जन्माष्टमी, १५ ऑगस्टला स्वतंत्र दिन, १६ ऑगस्टला रविवारी, २१ ऑगस्ट रोजी हरितालिका, २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आणि चौथा शनिवार, तर २३ ऑगस्ट रोजी रविवार येते. ३१ ऑगस्ट रोजी मोहरम आणि ओणम सण आहे. त्यामुळे १२ दिवस बँका बंद असणार आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर या सुट्ट्यांची माहिती देण्यात आली आहे. या वेबसाइटवर अन्य महिन्यातील सुट्ट्यांची यादी देण्यात आली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment