• Home
  • 🛑 स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन…! Redmi Note 9 🛑

🛑 स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन…! Redmi Note 9 🛑

🛑 स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन…! Redmi Note 9 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मोबाईल विश्व :⭕Redmi Note⭕ त्यांच्या आधीच्या मॉडेलमधील सर्वात आवडते फीचर्स आणि नवीन अपग्रेड्ससह पुन्हा एकदा घेऊन येत आहे Redmi Note 9. आधीच्या मॉडेलपेक्षा आणखी चांगला अनुभव देणाऱ्या नवीन Redmi Note 9 मधील ऑक्टा-कोर प्रेसेसरमुळे तुम्ही कोणत्याही अडथळ्यांशिवाय निरनिराळे गेम्स खेळून गेमिंगचा एक अप्रतिम अनुभव घेऊ शकता.

Redmi Note सिरीजमधील आधीच्या मॉडेल्सप्रमाणेच Redmi Note 9 जास्तीत जास्त युजेज (वापर), स्ट्रीमिंग आणि गेमिंग करण्यासाठी डिझाईन केला आहे.

Redmi Note 9 मध्ये मीडियाटेक हेलियो G85 चिप आणि मीडियाटेक हायपरइंजिन या नवीन तंत्रज्ञानाचा समावेश केल्याने हा फोन दीर्घकाळ वापरल्याने गरम होत नाही. आधीच्या Redmi Note 8 शी तुलना केल्यास नवीन मॉडेलमध्ये GPU परफॉर्मन्स 25% जास्त तर CPU परफॉर्मन्स 21% जास्त आहे.

तुम्ही प्रीमियम फीचर्स असलेला व तुमच्या खिशालासुद्धा परवडेल, असा स्मार्टफोन शोधताय का? 16.5cm (6.53 इंच) स्लीक असलेल्या या स्मार्टफोनमध्ये आहे फुलएचडी+ डॉटडिस्प्ले आणि 13MP क्षमतेचा सेल्फी कॅमेरा. या फोनमधील ‘TÜV राईनलंड लो ब्लू लाईट सर्टिफिकेशन’ हे तंत्रज्ञान फोनवर वाचन करताना डोळ्यांवर ताण येणार नाही याची काळजी घेतं. Redmi च्या गोरिला ग्लास 5 मुळे या फोनच्या स्क्रीनवर स्क्रॅचेस पडत नाहीत म्हणजेच स्क्रीन आणि डिस्प्ले राहतात अगदी सुरक्षित. हे सगळे दमदार फीचर्स असलेला Redmi Note 9 केवळ ₹11,999 किंमतीत उपलब्ध आहे!

Redmi Note 9 Pro सिरीज सारखिच डिझाईन असलेल्या Redmi Note 9 मध्ये आहे ऑरा बॅलन्स डिझाईन. Redmi Note 8 सिरीजसारखेच Redmi Note 9 च्या मागील बाजूला चौकोनी मॉड्यूलमध्ये (आकारात) आहे क्वॉड-कॅमेरा म्हणजेच चार कॅमेऱ्यांचा सेट-अप. या कॅमेरा सेट-अपमध्ये 48 मेगापिक्सेलची क्षमता असलेला मेन कॅमेरा आणि उत्कृष्ट पॅनोरॅमिक शॉट्स काढण्यासाठी 8MP ची क्षमता असलेली 118 डिग्री अल्ट्रा-वाईड लेन्स आहे. शिवाय 2MP क्षमतेचा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP क्षमतेचा डेप्थ सेन्सर कॅमेरासुद्धा आहे. सेल्फी प्रेमींसाठी या फोनमध्ये AI Beautify आणि शॉर्ट फिल्म शूटिंग हे दोन फीचर्स असलेला 13MP क्षमतेचा सेल्फी कॅमेरासुद्धा आहे.

5,020mAh क्षमतेची बॅटरी असल्याने या स्मार्टफोनवर तुम्ही 13 तास गेम्स खेळू शकता, 147 तास तुमची आवडती गाणी ऐकू शकता आणि हा फोन 16 तासांकरिता नॅव्हिगेशनसाठी देखील वापरू शकता! Redmi Note 9 सोबत 22.5W चा फास्ट चार्जरही उपलब्ध आहे जो कमीतकमी वेळात हा फोन चार्ज करतो. शिवाय या स्मार्टफोनमध्ये 9W रिवर्स चार्जसुद्धा आहे, म्हणजेच हा स्मार्टफोन तुम्ही इयरबड्स, स्मार्ट बँड, इतर स्मार्टफोन्ससारखी उपकरणे चार्ज करण्यासाठीसुद्धा वापरू शकता!

अप्रतिम फीचर्स असलेला Redmi Note 9 ॲक्वा ग्रीन, आर्क्टिक व्हाईट आणि पेबल ग्रे अशा तीन अनोख्या रंगांत उपलब्ध आहे. उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारा आणि मल्टिटास्किंगसाठी परिपूर्ण असलेल्या या स्मार्टफोनची किंमत फक्त INR ₹11,999 आहे.

तुम्ही नेक्स्ट जेनरेशनच्या स्मार्टफोनचा अनुभव घेण्यास आहात का तयार?….⭕

anews Banner

Leave A Comment