Home Breaking News 🛑 घरातले सर्व पाँझिटिव्ह…! माणुसकी शेवटी उपसरपंचाने दिला अग्नी…🛑 ✍️पुणे :( विलास...

🛑 घरातले सर्व पाँझिटिव्ह…! माणुसकी शेवटी उपसरपंचाने दिला अग्नी…🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

96
0

🛑 घरातले सर्व पाँझिटिव्ह…! माणुसकी शेवटी उपसरपंचाने दिला अग्नी…🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

जुन्नर/पुणे:⭕ कोरोनाच्या काळात पॉझिटिव्ह झालेल्या आपल्याच माणसांपासून आपली माणसं दूर गेलीत तर काही ठिकाणी दूरची माणसं मदतीनिमित्त जवळ आली. असाच एक माणुसकीचा प्रकार आज जुन्नर तालुक्यात पहायला मिळाला आणि पोलीस आणि आरोग्य विभागाच्या माणुसकीचा प्रत्यय गावकऱ्यांनाही आला.

जुन्नर तालुक्यातील धनगरवाडीत एकाच कुटुंबातले 9 जण कोरोना पॉझिटिव्ह असताना घरातील वृद्धेचा आज मृत्यू झाला पण या वृद्धेवर अंत्यसंस्कार करायला कोणीही मागे नसताना नारायणगाव पोलीस आणि आरोग्य विभाग पुढे आला आणि गावकऱ्यांनी सुद्धा या बद्दल प्रशासनाला सॅल्युट केला.
धनगरवाडीत येथील या कुटुंबात मुंबईची एक महिला गावी आली आणि संसर्गामुळे घरातील सगळेच बाधित झाले.
या सगळ्यांवर लेण्याद्री COVID केअर सेन्टर येथे उपचार चालु असताना घरातील 85 वर्षीय वृद्ध आजीचा मृत्य झाला.
आजीच्या अंतविधी करण्यासाठी घरात कोणीही नसल्याने नारायणगाव पोलीस, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या वतीने हा केला अंत्यविधी शनिवारी केला.

धनगरवाडीचे माजी उपसरपंच महेश शेळके यांनी पीपीई किट परिधान करून मृतदेह स्मशान भूमीत पोहच केला आणि अग्निडाग दिला.
या आजीसुद्धा कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा अंदाज असून त्यांचा अंतविधी करण्यासाठी कोणीही नसल्याने पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला
नात्यातील सगळे कोव्हिडं सेंटरला उपचार घेत असताना प्रशासनातील या कोव्हिडं योध्यानां सलाम केला पाहिजे….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here