Home गुन्हेगारी कागल तालुक्यातील महीलेचा सँनिटायझर स्फोटात मृत्यू

कागल तालुक्यातील महीलेचा सँनिटायझर स्फोटात मृत्यू

116
0

राजेंद्र पाटील राऊत

कागल तालुक्यातील महीलेचा सँनिटायझर स्फोटात मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील बोरवडे ( तालुका कागल) येथील
सौ. सुनीता धोंडिराम काशिद वय ४० ह्या घरातील केरकचरा पेटवताना कचर्‍यात असणार्‍या सॅनिटायझर बाटलीचा स्फोट होऊन गंभीर जखमी होऊन शनिवारी रात्री उशिरा छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयामधे मृत्यू झाला.
चार दिवसांपूर्वी सुनीता काशिद घराची झाडलोट झाल्यानंतर सर्व कचरा घराच्या बाहेर मोकळ्या जागेत पेटवत असताना या कचर्‍यात सॅनिटायझरची बाटलीही होती. कचरा पेटविल्यानंतर अचानक बाटलीचा स्फोट होऊन त्यातील काही सॅनिटायझर सुनिता काशिद यांच्या अंगावर उडाले, त्यामुळे कपड्यांनी पेट घेतला. यामध्ये त्या ८० ते ९० टक्के भाजल्या होत्या.
त्यांना तातडीने सी.पी.आर. रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे बोरवडे परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे. सौ. सुनीता यांचे पती धोंडिराम काशिद ग्रामसेवक आहेत.
कोरोना महामारीमुळे प्रत्येक घरात सुरक्षा म्हणून सॅनिटायझर आणले जाते. घरातील मोठ्यांबरोबरच लहान मुलेही सॅनिटायझरची बाटली हाताळत असतात. शाळांतील दप्‍तरात सॅनिटायझर बाटली आढळून येते. त्यामुळे न कळत त्यांच्या हातून ही बाटली गहाळ होऊन ती कचर्‍यात जमा होण्याची शक्यता असते. सॅनिटायझर हे ज्वलनशील असल्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleझाडांवर खिळे ठोकणे , जाहिरातींचे फलक लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होणार
Next articleवास्तुपुरुषाची जन्मकथा मत्स्यपुराण नुसार व वास्तुशास्त्राचा उगम व विकास
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here