Home नांदेड जिल्हापरिषद गट निहाय “शासन आपल्या दारी” उपक्रम राबवावा – ज्ञानेश्वर प्रेमलवाड

जिल्हापरिषद गट निहाय “शासन आपल्या दारी” उपक्रम राबवावा – ज्ञानेश्वर प्रेमलवाड

97
0

आशाताई बच्छाव

IMG-20230617-WA0033.jpg

जिल्हापरिषद गट निहाय “शासन आपल्या दारी” उपक्रम राबवावा – ज्ञानेश्वर प्रेमलवाड

अंबादास पाटिल पवार
लोहा प्रतिनिधि
नांदेड जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद/पंचायत समिती गटनिहाय शासकीय नोडल अधिकारी नियुक्त करत

“महसूल,कृषी,मनरेगा(रोजगार हमी),पाणीपुरवठा,रेशनिंग,विद्युत,शालेय – क्रीडा,वन विभाग,बँकिंग/बचतगट,आरोग्य,औद्योगिक,केंद्र व राज्य सरकारच्या लाभाच्या विविध योजना यासह संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना,रेशन कार्ड दुरुस्ती,नवमतदार नोंदणी/मतदान कार्ड दुरुस्ती,शालेय विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला,चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र” व महसुली विविध प्रकारच्या लाभाच्या योजना व अन्य ज्या काही शासकीय योजना किंवा जनतेच्या समस्या असतील तर निवारणासाठी विशेष उपाययोजना कराव्यात,वरील योजनांच्या लाभापासून जिल्हापरिषद/पंचायतसमिती गटनिहाय जिल्ह्यातील तालुकानिहाय अनेक नागरिक शासकीय योजना लाभापासून वंचित राहत असून,तरी या वंचित वर्गाला जिल्हा प्रशासन/महसूल विभागाच्या माध्यमातून वरील योजनांचा लाभ मिळावा त्यांची सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लागावीत,यासाठी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने “शासन आपल्या दारी” ही योजना आखून दिली असून,या योजनेच्या कालावधीत ‘अंत्योदय’ हे लक्ष साधत महाराष्ट्र राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार काम करत आहे.

परन्तु जिल्हा प्रशासनाने जर जिल्हा परिषद/पंचायत समिती गट निहाय हा उपक्रम राबविला तर निश्चितच शेतकरी,कष्टकरी बांधव नेहमी शासकीय लाभापासून वंचित राहतात त्यांना या उपक्रमाचा यथायोग्य लाभ मिळेल ही आमची पारदर्शी भूमिका असून,जिल्हाधिकारी – जिल्हा प्रशासनाच्यावतीने आपण सहकार्य करावे,अश्या मागणीचे पत्र प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांना भाजप पंचायतराज व ग्रामविकास मराठवाडा सह संयोजक ज्ञानेश्वर प्रेमलवाड यांनी दिले,यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर,महानगर संयोजक निलेश कुंटुरकर,माधव पांचाळ आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here