Home माझं गाव माझं गा-हाणं मालेगांव तहसिलचा अजब कारभार सरपंच पदाची आरक्षण सोडत एक वर्षभर लांबणीवर!! तहसिलदाराचे...

मालेगांव तहसिलचा अजब कारभार सरपंच पदाची आरक्षण सोडत एक वर्षभर लांबणीवर!! तहसिलदाराचे पत्र झाले व्हायरल…!!

781
0

राजेंद्र पाटील राऊत

मालेगांव तहसिलचा अजब कारभार
सरपंच पदाची आरक्षण सोडत एक वर्षभर लांबणीवर!! तहसिलदाराचे पत्र झाले व्हायरल…!!
(निंबा जाधव विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव-सरकारी कामकाजाच्या त-हा या अजबच असतात,लालफीतीचा कारभार म्हणा किंवा सरकारी दप्तर दिरंगाईचा फटका अथवा सरकारी बाबुच्या (अ) कर्तबगारीचा अजब कारभार काय असतो,याचा प्रत्यय मालेगांव तालुक्यातील जनतेला येत आहे.
नुकत्याच मालेगांव तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तब्बल एक वर्षाने म्हणजेच २८ डिसेंबर २०२१ रोजी होणार असल्याचे मालेगांवचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्या सहीनिशी असलेले पत्र सर्वत्र व्हायरल होत असल्याने नागरिकात सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तर युवा मराठा ने तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्याशी दुरध्वनीवरुन या प्रकाराच्या प्रतिक्रीयेबाबत संपर्क साधला असता,त्यांचेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही,
दरम्यान नंतर पुन्हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उद्या २८ जानेवारी २०२१ रोजीच होणार असल्याचे पत्र काढण्याची नामुष्की तहसीलच्या प्रशासनावर ओढवल्याने उशिरा सुचलेले शहाणपणच या प्रकरणातून समोर येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here