• Home
  • २४ तासात १ हजार ४०० सॅम्पल टेस्ट करणारी ‘ही’ अत्याधुनिक मशीन अखेर भारतात दाखल!

२४ तासात १ हजार ४०० सॅम्पल टेस्ट करणारी ‘ही’ अत्याधुनिक मशीन अखेर भारतात दाखल!

⭕२४ तासात १ हजार ४०० सॅम्पल टेस्ट करणारी ‘ही’ अत्याधुनिक मशीन अखेर भारतात दाखल

  • ⭕मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई – कमी वेळात अधिक चाचण्या करणे आता शक्य होणार आहे. कमी वेळेत अधिक चाचण्या करण्याच्या उद्देश्याने केंद्र सरकारने ‘कोबास ६८००’ मशीन मागवली आहे. या मशीनच्या माध्यमातून अधिक चाचण्या करता येणार आहेत. या मशीनचा वापर मुंबईत केल्यास कमी वेळात अधिक टेस्ट करता येणार आहेत.

अत्याधुनिक कोबास ६८०० मशीनच्या साहाय्याने झटपट चाचण्या करणे शक्य होणार आहे. मशीनमुळे २४ तासात १ हजार ४०० सॅम्पल टेस्ट करण्याची या मशीनची क्षमता आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी नुकतेच हे मशीन नॅशनल स्टडीज फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) कडे सुपूर्द केले. झटपट कोरोना चाचण्या होणारे आणि भारतात दाखल झालेले हे पाहिलेच अत्याधुनिक मशीन आहे.

एनसीडीसी सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले हे मशीन ‘रोबोटिक्स’ने परिपूर्ण असल्याने स्वयंचलित आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित सॅम्पलची चाचणी करणे शक्य झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना  बाधा होण्याचा धोका आता निर्माण होणार नाही. तसेच वेळेची मोठी बचत देखील होणार आहे.

कोबास ६८०० मशीनला टेस्टिंगसाठी न्यूनतम बीएसएल 2 आणि ‘कंट्रोल लेव्हल’ची लॅब आवश्यक आहे. कोबास ६८०० मशीनच्या साहाय्याने हेपीटायसिस बी ऍण्ड सी, एचआयव्ही, एमटीबी, पॅपिलोमा, सीएमव्ही, क्लँमाइडिया, नेयसिरेमिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांची चाचणी ही करते.

देशात कोरोना संसर्गाचा कहर दिवसेंदिवस दिवस वाढत आहे. आतापर्यंत २० लाख लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. दररोज साधारणता 1 लाख नमुन्यांची चाचणी करण्यात येत आहे. कमी वेळात आणखी चाचण्या करणे गरजेचे आहे. करण जेवढ्या चाचण्या होतील तेव्हडी परिस्थिती हाताळणे सोपे जाईल.

देशभरात कोरोना बाधितांची संख्या 80 हजाराच्यावर पोचली आहे. त्यामुळे सरकार ही चिंतेत आहे. राज्यात खास करून मुंबईत ही कोरोना संसर्ग वेगाने पसरतोय. राज्यात 33 हजाराच्या वर रुग्णांची संख्या पोहोचली असून मृतांचा आकडा ही १,२०० वर गेला आहे. तर मुंबईत रुग्णांचा आकडा २०हजाराच्या वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा ७३४ झाला आहे. मे महिन्यांनंतर जून महिना निर्णायक ठरणार आहे. अश्या वेळी कमी वेळात अधिक चाचण्या केल्यास परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल.

anews Banner

Leave A Comment