Home रत्नागिरी चिपळूण मेमन जमात तर्फे स्वांतत्रतेचे ७५वे अमृत महोत्सवी वर्ष मतिमंद मुलांसोबत साजरे

चिपळूण मेमन जमात तर्फे स्वांतत्रतेचे ७५वे अमृत महोत्सवी वर्ष मतिमंद मुलांसोबत साजरे

113

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0040.jpg

चिपळूण मेमन जमात तर्फे स्वांतत्रतेचे ७५वे अमृत महोत्सवी वर्ष मतिमंद मुलांसोबत साजरे                   रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

चिपळूण मेमन जमात तर्फे स्वांत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने कोवॅस संचालित जिद्द मतिमंद मुलांची शाळा येथे ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या मुलांना काही आनंदाचे क्षण देता यावे या उद्देशाने या जागेची निवड करण्यात आली. बरोबर ८ वाजता शाळेच्या प्रांगणात चिपळूण मेमन जमात चे अध्यक्ष मा. अशरफ भाई मेमन यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आले.

त्यानंतर संस्थेच्या हॉल मध्ये प्रार्थना गीताने कार्यक्रम ची सर्वात झाली. संस्थेच्या सचिव जांभेकर मॅडम यांनी संस्थेची सविस्तर माहिती व येणाऱ्या काळा मध्ये घेतले जाणारे उपक्रमांची माहिती दिली. या वेळी चिपळूण मेमन जमात चे अध्यक्ष अश्रफ भाई मेमन, उपाध्यक्ष समीर भाई मेमन, सचिव शादाब भाई फझलानी, युथ विंग चे संचालक आफताब भाई कच्छी, व जमातीचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. या प्रसंगी चिपळूण मेमन जमात यांच्या कडून २ मुलांचे पालकत्व स्विकारण्यात आले. तसेच अध्यक्ष अश्रफ भाई मेमन यांचेकडून शाळे साठी स्वातंत्र्याचे ७५ वर्ष पूर्ण झाले या अनुषंगाने ७५००० ची वयक्तिक रक्कम देणगी म्हणून देण्यात आली.

Previous articleचिपळूणातील ऐतिहासिक वीरेश्वर तलावात मृत माशांचा खच
Next articleलाकूड मालाच्या वाहतुकीसाठी ई-टिपी प्रणाली लागू जाचक अट रद्द करावी- श्री रवींद्र पालांडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.