Home नागपूर लाकूड मालाच्या वाहतुकीसाठी ई-टिपी प्रणाली लागू जाचक अट रद्द करावी- श्री रवींद्र...

लाकूड मालाच्या वाहतुकीसाठी ई-टिपी प्रणाली लागू जाचक अट रद्द करावी- श्री रवींद्र पालांडे

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0025.jpg

लाकूड मालाच्या वाहतुकीसाठी ई-टिपी प्रणाली लागू जाचक अट रद्द करावी- श्री रवींद्र पालांडे                   नागपूर,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क) 

नागपूर वनवृतांत मालकी क्षेत्रातील काष्ठ मालाच्या निर्गतीसाठी ई- टीपी प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यामुळे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी आणि लाकूड व्यापारी वर्गाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कोकणातील सर्वात मोठा आणि आनंदाचा गणेश उत्सवाचा सण तोंडावर आला आहे. यामुळे वन विभागाच्या जाचक फतव्यामुळे जळावू आणि इमारती माल योग्य वेळी. बाहेर वाहतूक करणे जिकरीचे झाले असून शेतकरी आणि व्यापारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांची होणारी आर्थिक कोंडी दूर करावी अशी मागणी रत्नागरी जिल्हा शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री रवींद्र पालांडे देशमुख यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

रत्नागरी जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात जवळ पास 99 टक्के खासगी मालकीक्षेत्र आहे. जिल्ह्यात शासकीय वनक्षेत्र अत्यल्प आहे. येथील शेतकरी आपल्या मालकीतील झाड माडे विकून सण समारंभ, मुलांचे शिक्षण आणि आपल्या दैनंदिन गरजा भागवतो. लाकूड व्यवसायातून मोठ्या प्रमणावर स्थानिक रोजगानिर्मिती अवलंबून असते. तसेच पश्चीम महाराष्ट्रातील अनेक उद्योग धंदे कोकणातून होणाऱ्या जळवू आणि इमारती लाकूड सामानावर अवलंबून आहेत. खास करून कोकणातील साग, फणस लाकूड समानाला बाहेर मोठी मागणी आहे.

आतापर्यंत कोकणातील लाकूड माल वन खात्याकडून निर्गमीत होणाऱ्या वाहतूक पासाव्दारे होत होती. मात्र दिनांक 15ऑगस्ट पासून आता संगणकीय ई टिपी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. मुळात कोकणात शेतकरी वर्ग हा कमी शिक्षित आहे. भाग दुर्गम आहे. मोबाईल नेट वर्क ची वानवा आहे. आणि वन विभागाकडे मनुष्य बळ अतिशय कमी आहे. जिल्ह्यात खासगी वन क्षेत्र असल्यामुळे नवीन वाहतूक पास प्रणाली शेतकरी वर्गाच्या मुळावर उठणारी आणि आर्थिक कोंडी करणारी आहे. तरी ही जाचक ई -टिपी प्रणाली त्वरीत रद्द करावी अशी मागणी शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री पालांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, वन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार आणि रत्नागरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here