Home Breaking News 🛑 लाल महल ते लाल किल्ला…! मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडणार :- श्रीमंत...

🛑 लाल महल ते लाल किल्ला…! मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडणार :- श्रीमंत शाहू छत्रपती महाराज 🛑

122
0

🛑 लाल महल ते लाल किल्ला…! मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडणार :- श्रीमंत शाहू छत्रपती महाराज 🛑
✍️ कोल्हापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

कोल्हापूर :⭕ मराठा समाजाला आरक्षण व सारथी संस्थेला स्वायत्तता मिळावी यासाठी ‘लाल महाल ते लाल किल्ला’ असे आंदोलन छेडण्यात येणार आहे. लाल महाल येथे २९ ऑक्‍टोबरला आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी बैठक होणार असून, दिल्लीत मराठ्यांची ताकद दाखविण्यात येणार आहे. तसा निर्धार सकल मराठा समाजातर्फे आयोजित व्यापक मेळाव्यात करण्यात आला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित होते. धैर्यप्रसाद कार्यालयात मेळावा झाला.

यावेळी बोलताना शाहू महाराज म्हणाले, “केंद्र व राज्य सरकारकडे नेमके काय मागायचे, याची दिशा निश्चित झाली पाहिजे. सारथी संस्थेला स्वायतत्ता मिळविण्याचा प्रश्न आहे.

अन्य संस्थांना स्वायत्तता दिली जात असताना ती सारथीला का नाही, याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. संस्थेला निधी मिळविण्याची आवश्यकता आहे. मराठा आरक्षणाचा लढा सर्वोच्च न्यायालयात जिंकायचा आहे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या पाठबळाची गरज लागणार आहे. केंद्र शासन मनापासून मराठा आरक्षण देण्यासाठी आग्रही आहे का, हे तपासून पाहावे लागेल. केंद्र शासनाचा दबाव नसेल तर काहीच होणार नाही. अन्यथा आपण केवळ आरक्षणासाठी भांडत राहू.”

ते म्हणाले, “मराठा समाजाने भावनांवर नियंत्रण ठेवावे. खासदार व आमदारांनी पुढे येऊन आरक्षणाच्या अनुषंगाने ठराव मंजूर करावेत. त्याचबरोबर समाजाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी लक्ष द्यावे. कृषी, उद्योगधंदे, स्पर्धा परीक्षेत मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत‌. राजकीय दृष्ट्यासुद्धा समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मराठा समाज अडचणींवर मात करणारा आहे.” समाजाच्या आंदोलनात मी सेवक म्हणून सहभागी होणार आहे. छत्रपती म्हणून नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

संभाजीराजे म्हणाले, “दिल्लीतील पाया पक्का केला आहे. त्यासाठीच खासदारांना एकत्र करण्याची भूमिका घेतली. दिल्लीवर धडक मारण्यासाठी चळवळ आधीच सुरू झाली आहे. दिल्लीवर धडक द्यायची असेल तर पक्के नियोजन करावे लागेल. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा दिल्लीत जायला हवा.

सारथी संस्थेला स्वायतत्ता मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. तत्पूर्वी सारथी संस्थेबाबत प्रबोधन गरजेचे आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मराठा समाजाला घडविले शकतो त्याकरिता बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेला निधी कधी येणार?.” गरीब मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न आहे. मराठा समाजाचा लढा पुन्हा सुरू झाला आहे.

मराठवाड्यात बहुजन म्हणजे दलित व मराठा म्हणजे वेगळा असा समज आहे. त्यामुळे बहुजन ही संकल्पना नेमकी काय, हे तिथल्या लोकांना सांगावे लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले….⭕

Previous article🛑 पाणीच पाणी चोहीकडे…! शहरात नालेसफाईचा बोजवारा 🛑
Next article🛑 *वृत्तपत्राचे महत्व समाजात वृद्धींगत करणारा संदेश दर्शवणारे टी-शर्ट चे अनावरण* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here