Home Breaking News महात्मा गांधी विद्यामंदीर संचलीत महाराजा सयाजीराव महाविद्यालयाची इमारत कोरोना संकट काळात आज...

महात्मा गांधी विद्यामंदीर संचलीत महाराजा सयाजीराव महाविद्यालयाची इमारत कोरोना संकट काळात आज हॉस्पिटल रुपात उभी राहिल्याचे बघुन खुप गर्व वाटला

135
0

महात्मा गांधी विद्यामंदीर संचलीत महाराजा सयाजीराव महाविद्यालयाची इमारत कोरोना संकट काळात आज हॉस्पिटल रुपात उभी राहिल्याचे बघुन खुप गर्व वाटला, या विद्या मंदिराचे मालेगाव वर आलेल्या संकटात आरोग्या मंदिरात रुपान्तर झाले हे बघुन अभिमान वाटला आणी 2 शब्द लिहावे वाटले, आम्ही शिकलो या स्वरस्वती मंदिरात, अनेक पिढ्या चांगले शिक्षण घेउन घडल्या या पवित्र विद्या मंदिरात आणी आज ही सरस्वती माता संकट काळात हॉस्पिटल म्हणून उभी ठाकली आहे, म्हणून माझ्या या मातेला माझे नमन आमचे हे महाविद्यालय हे आमच्या साठी आदर्श आहे, इथेच आम्ही शिकलो मोठे झालो खेळलो , अनेक खेळाडु राज्य स्तरावर खेळून चांगल्या नोकरीला लागले, अनेक मुले या मंदिरात शिक्षण घेउन उच्च पदावर नोकरी करीत आहेत,आज ही माता मालेगाव वर आलेल्या संकटात आपल्या पोरासाठी त्यांचे आरोग्याचे रक्षण करणेसाठी धावून आली, कधी वाटले नसेल या विध्या मंदिराला की आपल्या मंदिरात शिकलेल्या पोरांना इथे हॉस्पिटल म्हणून उपचारासाठी दाखल व्हावे लागेल, मित्रानो सगळे सुरळीत चालले होते पण अचानक हा कोरोना रुपी राक्षस मालेगावी येऊन ठेपला आणी मालेगाव मध्ये कोरोना ने हाहाकार माजवला आहे शासकिय दवाखाने ची जागा कमी पडू लागली, दिवसे दिवस कोरोना बाधित संख्या वाढत आहे अश्या वेळी आदरणीय प्रशांत दादा हिरे, अपुर्व भाऊ हिरे,अद्वय आबा हीरे, यानी महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाची ही पवित्र वास्तू कोरोनटाइन साठी ऊपलब्ध करुन दिली त्यांचे खुप खुप आभार,आज आपल्या मालेगाववर ओढवलेल्या या भीषण संकटात आपले लाडके आमदार कृषी मंत्री दादासाहेब भुसे हे सतत लक्ष ठेवून स्वत जनतेसाठी झटत आहेत, राजेंद्र भोसले,सुनिल आबा गायकवाड, बंडू काका बचाव, तुषार दादा शेवाळे, अद्वय आबा, सुरेश नाना निकम सन्दीप बापू पाटील, प्रसाद बापू ,हे सर्व राजकीय नेते पक्ष भेद विसरुन या कोरोना युध्दात एकदिलाने काम करताना दिसत आहेत ही नक्कीच आम्हा मालेगाव करा साठी अभिमानाची बाब आहे, अश्या संकटात आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते, राजेंद्र भैया भोसले मित्र मंडळ, सुनिल आबा मित्र मंडळ, अद्वय आबा मित्र मंडळ, बारा बलुतेदार मंडळ, युवा सेना मालेगाव, मराठा महासंघ दाभाडी, शिवनेरी मित्र मंडळ दाभाडी, साने गुरुजी आरोग्य मंदीराने देखील या संकटात मोलाचे सहकार्य केले व करीत आहेत, सर्व कार्यकर्ते जिवाची पर्वा न करता गोर गरिब जनतेच्या अन्न पाण्याची सोय करीत आहेत, हे लोक मुक्या प्राण्याला देखील तितकाच जिव लावताना दिसत आहेत, निसार शैख हा समाज सेवक हा देखील मदत कार्य करुन माणुसकी चे दर्शन घडवीत आहेत , माझ्या मालेगाव कडे एक सवेदन शील दंगलिचे शहर म्हणून बघीतले जायचे आज सर्व जाती धर्माचे लोक, सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते हे एकत्र येऊन माणुसकीचे दर्शन घडवीत आहेत आम्ही मालेगाव वर लागलेला हा डाग पुर्णपणे पुसुन काढला आहे, आणी एक नविन सुरुवात आम्ही सगळे एक आहोत अशी केली आहे, मित्रांनो मी रावळगाव कर आणी माझे मालेगाव शी घट्ट प्रेमाचे, आपुलकीचे नाते म्हणून प्रेमापोटी , काळजी म्हणून हे लिहिले आहे, कुणा समाज सेवक वा जन प्रतिनिधि यानी केलेल्या मदत कार्यबद्दल माझ्याकडून त्यांचा नाम उल्लेख राहून गेला असल्यास मी क्षमा मागतो पन सर्वानी एकत्र येऊन पक्षभेद, जातिभेद विसरुन कोरोना शी जो लढा चालविला आहे तो समस्त मालेगाव कर यांच्या साठी अभिमानसपद आहे, आणी ही बाब आम्ही कायम स्मरणात ठेवून सर्व महाराष्ट्राला सांगत राहू मित्रांनो समोर आलेले संकट भयानक आहे ,या परिस्थीतीत अनेक डॉक्टर , नर्स , पोलिस, आपल्या जिवाची पर्वा न करता, गेल्या 2 ते अडीच महिन्या पासुन अहोरात्र झटत आहेत,आनंदाची बाब म्हणजे अनेक बाधित पेशंट कोरोना मुक्त होउन घरी परतत आहेत, मालेगाव करानो हे युध्द आपण जिंकणार आहोत फक्त सय्यम ठेवा, शिस्त पाळा, प्रशासनाला सहकार्य करा, घरी रहा, आपला विजय जवळ आहे, मालेगाव सोबत माझ्या रावळगाव मध्ये ही हा राक्षस घुसला आहे ,रावळगाव कर मित्रांनो काळजी घ्या, आपले गाव ही लवकर कोरोना मुक्त होईल , सर्व सकारात्मक रहा, आत्मविश्वासाने संकटाला सामोरे जा, आपण सगळे हताश झालो आहोत आणी तो शृष्टी चा निर्माता कुठे हरवला का रागवला हे कळेनासे झाले आहे, हे देवा, परमेश्वरा, शृष्टी विधात्या कुठे हरवला तू का रुसलास का रागवलास तू, या कोरोना विषाणू ने शृष्टीत विष पेरले आहे, या राक्षसाने संपुर्ण मानव जात हादरुवुन टाकली आहे, दीन दुबळ्याचा तू कैवारी तुझी ही लेकरे केवील वाणी झालीत, चिमुकली मुलाना आम्ही देवाचे अवतार म्हणतो 3 महिने झालेत घरात बसुन आहेत त्यांचे चेहरा निस्तेज झालाय त्यांची तरी किव कर, मान्य आहे तू शृष्टी ची निर्मिती मानव कल्याणासाठी केली,ती जोपासने, पालन पोषण करने आमचे काम होते, स्वार्था पोटी आम्ही ते कर्त्यव्य विसरलो आणी जंगलेच तोडायला निघालो, पृथ्वीचा आन्त पाहिला भूगर्भशास्त्र न समजून घेता 500 फूटा प्रयन्त पाण्यासाठी जमीन खोदली, आकाशात अतिक्रमण केले, जंगले तोडली निसर्ग चक्र बिघडवले हया सगळ्या चुका तुझ्या हया लेकरानच्या आहेत त्या पदरात घे असा येकदम दूर ढकलून पोरके नको करु आम्हाला, आता चांगली अद्दल घडली आम्हाला,यापुढे आम्ही निसर्ग पालन पोषण करु पण आता तू या विषाणूला राक्षसाला पळवुन लाव व मानवाला संकट मुक्त कर, लवकर ये आम्ही तुझी वाट पहात आहोत, विष्णू अहिरे रावळगाव, 8149424787

Previous article🛑 यंदा चौपाटीवर बाप्पाच्या विसर्जनासाठी करावं लागणार Booking 🛑
Next articleआज शुक्र प्रदोश च्या मुहूर्ताला विजय शृष्टी परिवारातील सदस्यांनी समोरील नियोजित बागेत त्रिवेनी वृक्ष रोपन केले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here