• Home
  • आज शुक्र प्रदोश च्या मुहूर्ताला विजय शृष्टी परिवारातील सदस्यांनी समोरील नियोजित बागेत त्रिवेनी वृक्ष रोपन केले

आज शुक्र प्रदोश च्या मुहूर्ताला विजय शृष्टी परिवारातील सदस्यांनी समोरील नियोजित बागेत त्रिवेनी वृक्ष रोपन केले

आज शुक्र प्रदोश च्या मुहूर्ताला विजय शृष्टी परिवारातील सदस्यांनी समोरील नियोजित बागेत त्रिवेनी वृक्ष रोपन केले,नाशिक,(विष्णू अहिरे युवा मराठा  न्युज नेटवर्क)-वड, पिंपळ, बेल, वड, लिंब ची झाडे लावली त्याच बरोबर मागील वर्षी लावलेली झाडाना गवत काढून साफसफाई करुन कुंपण घालण्यात आले हे सर्व करीत असताना कित्येक दिवसांपासून रुसुन बसलेला वरुन राजा प्रसन्न होउन मुसळधार बरसू लागला कधीपासून आम्ही वाट बघत होतो पावसाची पन निसर्गराजा हुलकावणी देउन निघुन जात होता आणी आज आम्ही निसर्गाला खुश केले आणी बरसू लागला तो, म्हणून सांगतो मित्रानो हा महिना झाडे लावणे साठी खुप उपयुक्त आहे झाडे लावा झाडे जगवा तरच प्रदूषण थांबेल व आपले आरोग्य सुरक्षित राहिल आपण बघत आहोत आज परिस्थिती मग त्याचे महत्व आता तरी कळू दया. आमच्या विजय शृष्टी मधिल सर्व सभासद खुप उत्साहात वृक्ष लागवडीसाठी सहभाग घेत असतात व प्रोत्साहन ही देत असतात त्याचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे. आज शेवाळे दादा, कदम दादा, धामणे दादा, रमाकांत सोनवणे, राजेंद्र नाकोडे दादा , तुषार पाटील, यानी परिश्रम घेतले, शेजारील ठाकरे दादा हे आम्हाला नेहमी वन विभागातून झाडे उपलब्ध करुन देत असतात व मार्गदर्शन ही करीत असतात आपले खुप आभारी आहोत, सर्व विजय शृष्टी सभासदांना धन्यवाद

anews Banner

Leave A Comment