आंशुराज पाटिल मुख्य कार्यालय
रिसनगाव येथील आत्महत्याग्रस्त हाबगुंडे परिवारास टायगर ग्रुपची सांत्वन भेट व आर्थिक मदत
लोहा प्रतिनिधी अंबादास पाटिल पवार युवा मराठा न्युज नेटवर्क
तालुक्यातील रिसनगाव येथील शेतकरी मुक्ताजी रामा हाबगुंडे वय ६५ यांनी नापिकी व दुबार पेरणीच्या संकटामुळे नैराश्यातून शेतातील झाडास गळफास लावून आत्महत्या केली. मयत शेतकरी मुक्ताजी हाबगुंडे यांच्या कुटुंबीयांची टायगर ग्रूपचे तालुकाध्यक्ष वैभव हाके यांनी सांत्वन भेट देवून धीर देत आर्थिक मदत दिली.
रिसनगाव येथील मयत शेतकरी मुक्ताजी हाबगुंडे यांनी यावर्षी पावसाने ओढ दिल्याने पेरलेले पीक उगवेल का नाही.. तसेच घेतलेले पीक कर्ज कसे फेडायचे.. या विवंचनेत मुक्ताजी हाबगुंडे यांनी शेतातील झाडास गळफास लावून आत्महत्या केली. मयत हाबगुंडे यांच्या कुटुंबीयास टायगर ग्रूपचे तालुकाध्यक्ष वैभव हाके यांनी सांत्वन भेट देवून धीर देत आर्थिक मदत केली. तसेच शेतकऱ्यांनी खचून न जाता संकटाशी दोन हात करण्याची हिम्मत ठेवावी. आत्महत्या हा पर्याय नसून शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. धिरोदत्त पणे नैसर्गीक संकटास तोंड दिले पाहिजे असा आत्मविश्वास दिला.
यावेळी मयत शेतकरी हाबगुंडे यांचे पुत्र संग्राम हाबगुंडे सह बहुसंख्येने टायगर ग्रूपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.






