Home नांदेड देगाव वासीयांना या रस्त्यामुळे भोगावे लागतात नरक यातना

देगाव वासीयांना या रस्त्यामुळे भोगावे लागतात नरक यातना

77
0

आंशुराज पाटिल मुख्य कार्यालय

IMG-20230712-WA0053.jpg

देगाव वासीयांना या रस्त्यामुळे भोगावे लागतात नरक यातना

मुक्रमाबाद प्रतिनिधी बसवराज वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद ते देगाव रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याचे दिसुन येत आहे. गेल्या अनेक वर्षापासुन परतपुर फाटा ते देगाव खतगाव रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याच रस्त्यावर परतपुर फाट्याजवळच एका ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून पावसाळ्यात या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात टाकुन प्रवास करणे असाच प्रकार असल्याचे दिसते. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठी खड्डे पडून पाणी जमल्यामुळे खड्यातील पाण्याचा अंदाज येत नाही. यामुळे दुचाकी वाहन धारक गाडी घसरुन पडत आहेत.
संबंधित विभागातील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या ग्रामीण भागाच्या विकासाला अडथळा निर्माण होत आहे अशी चर्चा प्रवाशातुन होताना दिसुन येत आहे.
ग्रामीण भाग शहराशी
जोडला जावा म्हणून विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. दळणवळण व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागात राबविण्यात येतात माञ दर्जाहीन कामे करून शासनाला चुना लावला जात असल्याचे बोलले जात आहे. सध्या पावसाळा असल्याने
पाण्याने रस्त्यावर दोन-तीन फुटांचे खड्डे पडले आहेत. शाळकरी विद्यार्थी व शिक्षक ,प्रवाशांना या खड्ड्यातुन मार्ग शोधावे लागत आहे. विद्यार्थ्यांना, प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभाग या रस्त्याकडे विशेष महत्व देत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.यामुळे या रस्त्याला विद्रुपीकरणाचे स्वरुप आले आहे.
या रस्त्या संदर्भात अनेक वेळा मागण्या करून देखील संबंधित विभाग याकडे लक्ष देत नाही. या ठिकाणी जीवित हानी होण्याची शक्यता जास्त नाकारता येत नाही. जीवित हानी झाल्यावरच प्रशासन लक्ष देईल का ? असा प्रश्न पडल्या वाचुन राहत नाही.संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन तातडीने हा रस्ता बनवण्यात यावा अशी मागणी देगाव येथील नागनाथ रेड्डी यांनी केली आहे.

Previous articleतलाठी रातोळीकर यांना निरोप व पदाजी यांचे स्वागत
Next articleरिसनगाव येथील आत्महत्याग्रस्त हाबगुंडे परिवारास टायगर ग्रुपची सांत्वन भेट व आर्थिक मदत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here