Home जालना मोतीगव्हाण येथे शेतजमिनीच्या रस्त्याचा वाद विकोपाला

मोतीगव्हाण येथे शेतजमिनीच्या रस्त्याचा वाद विकोपाला

33
0

आशाताई बच्छाव

IMG_20240406_204546.jpg

मोतीगव्हाण येथे शेतजमिनीच्या रस्त्याचा वाद विकोपाला
न्यायालयाचे जैसे थे ठेवण्याचे आदेश असतानाही उपविभागीय अधिकारी यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिलेच कसे
परमेश्वर मोहिते, कारभारी मोहिते यांचा सवाल 

जालना,,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): तालुक्यातील मोतीगव्हाण येथ्ाील शेतजमिनीच्या रस्त्याचा वाद विकोपाला गेला असून, न्यायालयाचे जैसे थे ठेवण्याचे आदेश असतानाही उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिलेच कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी गुरुवारी आलेल्या मंडळ अधिकाऱ्याला जाब विचारत आक्षेप नोंदविण्यात आला. हा वाद विकोपाला जात असल्याने मंडळ अधिकाऱ्याने पंचनामा करुन जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले. तर न्यायालयाच्या निकालानंतर जो िनर्णय येईल, तो मान्य असेल, अशी भूमिका परमेश्वर नारायण मोहिते, कारभारी मोहिते यांनी घेतली आहे.
मोतीगव्हाण येथील गट क्रमांक १६९ मध्ये परमेश्वर नारायण मोहिते, कारभारी मोहिते  यांची शेतजमीन आहे. तर गटक्रमांक १६७ मध्ये श्रीमंत कारभारी मोहिते, नामदेव कारभारी मोहिते यांची शेतजमीन आहे. या शेतात जाण्यासाठी रस्ता करावा तो गट क्रमांक १६९ मधील शेतातून, अशी  मागणी श्रीमंत कारभारी मोहिते यांनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांनी श्रीमंत कारभारी मोहिते यांच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयाची अमलबजावणी करण्यासाठी मंडळ अधिकारी हजारे यांनी गुुरुवारी मोतीगव्हाण येथे भेट दिली. त्यावेळी श्रीमंत कारभारी मोहिते, नामदेव कारभारी मोहिते, राजेंद्र मोहिते यांच्यासह पाच ते सहा जणांनी गांेधळ घालत परमेश्वर नारायण मोहिते, कारभारी मोहिते यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

Previous articleआसई येथे दक्षिणमुखी हनुमान संस्थान ऐतीहासिक युद्धभूमी आसई नगरीत यात्रा महोत्सव
Next articleआनंद राज आंबेडकरांनी भूमिका केली पोस्ट आधी माघार नंतर होकार, आता लोकसभा निवडणूक लढवणार.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here