Home Breaking News ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ; राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार स्वामी

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ; राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार स्वामी

101
0

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ; राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार स्वामी

विशेष प्रतनिधी – राजेश एन भांगे

मुंबई, दि. ६ – ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही
विरोधकांतर्फे समाज समाजात फुटपाडण्याचे प्रयत्न हाणून पाडू राष्ट्रीय अध्यक्ष रवीकुमार स्वामी
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही
विरोधकांतर्फे समाज समाजात फुटपाडण्याचे प्रयत्न हाणून पाडू असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष रवीकुमार स्वामी
अखिल भारतीय ओबीसी महासंघाची बैठक आज सांगली येथील बैठकीत केले काल
सांगली येथे पार पडली.या बैठकीसाठी संपूर्ण राज्यातून ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत खालील मुद्यावर मागण्या करण्यात आल्या
१) राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ५२% लोकसंख्या इतर मागासप्रवर्गात आहे. राज्यातील इतर मागासवर्गीय या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता महाज्योती या संस्थेकरिता रु.२५० कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
२) राज्य मागासवर्ग आयोगावर केवळ इमाव/विजाभज(OBC/VJNT) प्रवर्गातील व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी.
३) राज्य शासनाच्या विविध विभागात मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांच्या पदोन्नत्या प्रलंबित आहेत. इतर राज्यांनी मागासवर्गीयांच्या पदोन्नतीबाबत मा.न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील निर्णय घेणे आवश्यक आहे.
४) सन २०१९-२० या वर्षाकरिता इमाव,विजाभज विमाप्र या प्रवर्गाची राज्यातील विद्यार्थ्यांकरिताची रु. १००० कोटी इतकी शिष्यवृत्ती प्रलंबित असून,सन २०२०-२१ या वर्षासाठी रु.२००० कोटीची तरतूद केली आहे. सबब शिष्यवृत्तीसाठी एकूण रु.३००० कोटी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
५) इतर मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल विविध योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांस वितरीत केले असून आज रोजी महामंडळाकडे भागभांडवल उपलब्ध नाही.सबब,या महामंडळाच्या भागभांडवलात रु.५०० कोटी इतकी वाढ करण्याची आवश्यकता आहे.
६) वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मार्फत वि.जा.भ.ज. प्रवर्गातील समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात. तथापि, उपरोक्त महामंडळामार्फत निधी लाभार्थ्यास वितरीत करण्यात आला असून आता भागभांडवलात वाढ करण्याची गरज आहे. तरी या महामंडळास रु.३०० कोटी भागभांडवल उपलब्ध करून द्यावे.
७) राज्यातील इमाव व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठी १ मुलींसाठी १ अशी एकूण ७२ वसतिगृहे सुरु करणे, याकरिता सद्यस्थितीत बांधकामे करणे शक्य नसल्याने भाडेतत्वावर इमारती घेऊन पुढील शैक्षणिक वर्षासाठी स्वतंत्र नवीन वसतिगृह सुरु करण्यात यावेत. त्यासाठी अंदाजे रु. १५० कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
८) ओबीसी समाजाच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश देण्याबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असून राज्यातील ओबीसी समाजाच्या ५५०० गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना राज्यातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी सन २०२०.२१ मध्ये रु. ५० कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात यावी. ९) इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी स्वतंत्र घरकुल योजना अस्तित्वात नाही. इतर मागास प्रवर्गाकरिता प्रस्तावित सावित्रीबाई फुले घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यात ५० हजार घरकुलांसाठी रु.१०० कोटी इतका निरधी उपलब्ध करून द्यावा.
१०) इतर मागास प्रवर्गाच्या आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी.
११) राष्ट्रीय जनगणनेत इतर मागासवर्गीयांची (OBC) स्वतंत्र जनगणना करण्यात यावी. १२) शासकीय सेवेतील इतर मागासवर्गीयांचा रिक्त पदाचा अनुशेष तातडीने भरण्याबाबत कार्यवाही सुरु करावी.
१३) राज्य शासनाने मराठा आरक्षणाचा जो कायदा मंजूर केलेला आहे व ज्याला मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे त्याला मा.सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली आहे. ती उठवण्यासाठी राज्य शासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करावेत.
१४) मराठा समाजाचा इतर मागासवर्ग प्रवर्गात (OBC) समावेश करू नये.
१५) राज्य शासनामार्फत नियोजित असलेली पोलीस भरतीसह कुठलीही भरती प्रक्रिया थांबविण्यात येवू नये. आवश्यकता भासल्यास मराठा समाजाकरिता एकूण पदभरतीच्या १२% जागा राखीव ठेवून स्वतंत्र भरती प्रक्रिया राबविण्यात यावी.
१६) महाराष्ट्र शासनाकडून विविध प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहाचा लाभ मिळालेला नाही. या विद्यार्थ्यांना दरवर्षी साठ हजार रुपये स्वाधार निधी दिला जातो. त्या प्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार निधी देण्यात यावा.
असे निवेदन मा. मुख्यमंत्री यांना पाठविण्याची मागणी करण्यात आली तसेच हे निवेदन लवकरच मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार आहे.असे वक्तव्य राष्ट्रीय *अध्यक्ष रवीकुमार स्वामी सर* यांनी केले.या बैठकीसाठी अखिल भारतीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय चे प्रदेशाध्यक्ष गौरव पाटील उपाध्यक्ष योगेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विक्रम विजापूरे.. प्रसिध्दी प्रमुख गणेश नकाते.. सातारा जिल्हा सरचिटणीस रवींद्र वाकडे महिला अध्यक्ष वैष्णवी गुरव, युवती अध्यक्ष वैष्णवी मठपती, युवक अध्यक्ष अमित कुमार हिरेमठ,आदी मान्यवर उपस्थित होते

Previous article*मुंबईहून बेस्टची सेवा बजावुन* *आलेल्या इचलकरंजी एसटी.* *कर्मचाऱ्यांना कोरोना* *हतबल चालक वाहक , हुकूमशाह अधिकारी*
Next article*निमगांव येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरेंची पुण्यतिथी उत्साहात साजरी*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here