Home गडचिरोली अतिदुर्ग भागातील पूरग्रस्तांना आ. वडेट्टीवारांनी दिला मदतीचा हात

अतिदुर्ग भागातील पूरग्रस्तांना आ. वडेट्टीवारांनी दिला मदतीचा हात

30
0

आशाताई बच्छाव

IMG-20220724-WA0056.jpg

अतिदुर्ग भागातील पूरग्रस्तांना आ. वडेट्टीवारांनी दिला मदतीचा हात

  गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

यंदाचे वर्षी जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. तसेच धरणांमध्ये जलसाठ्यातही प्रचंड वाढ झाली. यामुळे राज्य सीमेवर वसलेल्या सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थितीने महाकाय रूप धारण करून अनेक गावांना वेढा घातला. उद्भवलेल्या महापुरात तालुक्यातील एकूण 54 गावांना पुराचा फटका बसला असून अनेक गावात पाणी शिरल्याने नागरिकांनी अखेर जीव मुठीत घेऊन चक्क राष्ट्रीय मार्गावर तळ ठोकून वास्तव करीत असल्याचे विदारक परिस्थिती निर्माण झाली असताना भूक तहानेने व्याकुळ झालेले दुर्गम भागातील नागरिकांना आधार देण्यासाठी राज्याचे माजी आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सह पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना अन्नधान्य किट, ब्लॅंकेट ची मदत भोसले सोबतच नागरिकाची व्यथा जाणून घेत शासनासमोर पुनर्वसनाचा प्रस्ताव व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी प्रामुख्याने काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.नामदेवराव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे गडचिरोली जिल्हा सह प्रभारी शिवा राव, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, आनंदराव गेडाम, पेंटारामा तलांडी, प्रदेश सचिव डॉ नितीन कोडवते, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, जिवन नाट, समशेर पठाण, लॉरेन्स गेडाम जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, अनिल कोठारे, रजनीकांत मोटघरे, वामनराव सावसाकडे, माजी, रमेश चौधरी, मिलिंद खोब्रागडे, वसंत राऊत, दिवाकर नीसार, संजय चरडूके, मोहन नामेवार, निजाम पेंदाम, सुधीर बांबोळे, अनुप कोहळे, जावेद खान, तथा सर्व काँग्रेस सेल चे गडचिरोली जिल्हा पदाधिकारी व सिरोंचा तालुक्यातील बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

सिरोंच्या तालुक्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीला मेडीगट्टा धरण हेच कारणीभूत असून या धरणाच्या अभिशापामुळेच सुजलाम सुफलाम कृषी उत्पन्न देणार्या सिरोंचा तालुक्यातील शेतींना ग्रहण लागले असुन येथिल जनसामान्यांचे जीवन धोक्यात आले आहे. प्रचंड विरधानंतरही मागील महाराष्ट्र व तेलंगणा राज्य सरकारने नागरिकांच्या जीवाशी खेळ करून धरणाची उभारणी केली. याचा नफा केवळ तेलंगणा राज्याला मिळत असून महाराष्ट्राला मात्र प्रचंड नुकसान सहन करावा लागत आहे. आता तरी राज्य शासनाने या पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने भरपाई देऊन नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढावा अशी स्पष्ट मागणी राज्याची माजी कॅबिनेट मंत्री ,काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यावेळी सिरोंचा तालुक्यातील सोमणपल्ली, तुमनुर, पेंटीपाका,मृदू कृष्णपुर, मोगापुर, नगरंम, व अन्य पूरग्रस्त गावातील नागरिकांना अन्नधान्य किट व ब्लॅकेटचे वितरण करण्यात आले. या संकट परिस्थितीत नागरिकांनी धीर न सोडता त्यांच्यावर कोपलेल्या अस्मानी संकटाला तोंड देण्यासाठी काँग्रेस त्यांच्या पाठीशी असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले. तर वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाने तातडीने मदत पोहोचवावी असे आव्हाने या प्रसंगी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here