Home गडचिरोली शिवसेनेेने हिंदुत्वाशी कधीही तडजोड केली नाही. मा.बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून सत्ता असो...

शिवसेनेेने हिंदुत्वाशी कधीही तडजोड केली नाही. मा.बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून सत्ता असो वा नसो जनसेवेसाठी मी सदैव तत्पर …!

27
0

आशाताई बच्छाव

IMG-20220724-WA0048.jpg

शिवसेनेेने हिंदुत्वाशी कधीही तडजोड केली नाही.

मा.बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून सत्ता असो वा नसो जनसेवेसाठी मी सदैव तत्पर …!

शिवसेना सहसपंर्क प्रमुख श्री.अरविंदभाऊ कात्रटवार यांचे प्रतिपादन

वाढदिवसानिमित्य गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा जिल्हा परिषद क्षेत्रातिल मरेगाव येथील शेकडो माता भगिनींना वस्त्रभेट

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श जोपासून हिंदू हदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अंगिकार करून शिवसेना उभी केली.शिवसेनेने हिंदुत्वाचा बाणा सदैव जोपासला आहे.त्यात तडजोड अथवा प्रतारणा कधीच केली नाही.आजही हिंदुत्व आणि भगवा झेंडा यामुळे शिवसेनेची ओळख मराठी माणसांमध्ये कायम आहे शिवसेनेची हिंदुत्वाची ओळख कदापही पुसली जाणार नाही आणि ती पुसण्याची हिंमत कोणामध्येही नाही शिवसेनेने समाजकारणावर अधिक भर देऊन जनसेवेचा वसा जोपासाला आहे.सत्ता असो की नसो कट्टर शिवसैनिक जनतेच्या हितासाठी नेहमीच तत्पर असतो. हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श जोपासुन शिवसेना निर्माण केली तळागळातील गोरगरिब जनतेचा विकास हा शिवसेनेचा केंद्रबिंदु आहे बाळासाहेबांनी दिलेली शिकवण व त्यांचा आदर्श जोपासून एक कट्टर शिवसैनिक म्हणुन माझ्या हातून जनसेवेचे कार्य अविरत सुरु राहणार असे प्रतिपादन शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री. अरविंदभाऊ कात्रटवार यांचा वाढदिवस काल २३ जुलै रोजी असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्य शेकडो शिवसैनीकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्य गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा जिल्हा परिषद क्षेत्रातील मरेगाव येथे वस्त्रभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.वाढदिवसानिमित्य शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते शेकडो माता भगिनींना वस्त्रभेट देण्यात आले.याप्रसंगी माता भगिनींना संबोधीत करतांना अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, मा. बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब ठाकरे यांच्या कार्याचा आदर्श जोपासून जनसेवेचे कार्य माझ्या हातून सुरू आहे. कोणतीही समस्या उभी झाल्यास सर्वप्रथम शिवसैनिक मदतीसाठी पुढे येतो. संघर्षातूनच शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिवसेनेने आंदोलन, संघर्ष करून जनतेला न्याय मिळवून दिला आहे. शिवसेनेच्या प्रयत्नांमुळेच अमिर्झा जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक समस्या सुटल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वाढदिवसानिमित्य मरेगाव येथे वस्त्रभेटीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. काल शनिवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या.अशा परिस्थीतीत सुध्दा असंख्य माताभगिनींनी कार्यक्रमाला उपस्थितीत दर्शवून कात्रटवार यांच्याप्रती स्नेहभावनेचे दर्शन घडविले. पावसाची तमा न बाळगता कार्यक्रमला उपस्थित राहून स्नेहभाव जपल्याने शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी माताभगिनीं प्रति धन्यता व्यक्त केली. माताभगिनींवर अन्याय झाल्यास सदैव त्यांच्या पाठीशी राहून न्याय मिळवून देईन,अशी ग्वाही सुध्दा दिली. याप्रसंगी उपस्थित शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवर,सह संपर्क प्रमुख विलास कोडापे,उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, संजय बोबाटे,नानाजी काळबाधे,संदीप भुरसे,सुरज उइके,संदीप अलबनकर,निरंजन लोहबरे,स्वप्निल खांडरे,निकेश लोहबरे,राजू जवादे,अरुण बारापात्रे,हरबा दाजगये, सुमित सोनटक्के,तनबा दजगये,गोपाल मोगरकर, रमजी भांडेकर,उमाजी शिवनकर,नेताजी आलम,शालिक कोवाची,सचिन निलेकर,दिलीप वलादे, निकेश मड़ावी,रविंद्र मिसार,गोपाल पानसे, महेश झोड़े,रामचंद्र बह्यल,अमित हुलके,सचिन सेलोते,सूरज टेकाम,राहुल मड़ावी,अभिषेक सेलोते,आशीष शेडमाके,सूरज शेंडे,समीर गड़पायले, रमेश आकरे,अरविंद भांडेकर,यांच्या सह गावातील शेकडो माता भगिनी व गावकारी उपस्थित होते,

Previous articleमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे कडून भिमरगुडा येते किट वाटप
Next articleअतिदुर्ग भागातील पूरग्रस्तांना आ. वडेट्टीवारांनी दिला मदतीचा हात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here