Home कोल्हापूर छ. शिवाजी महाराज चौक मंडळाच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा 

छ. शिवाजी महाराज चौक मंडळाच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा 

92
0

राजेंद्र पाटील राऊत

छ. शिवाजी महाराज चौक मंडळाच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा करतांना कार्यकर्ते,
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष ७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध केला. याला २१ डिसेंबर या दिवशी ३५२ वर्षे पूर्ण झाली. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून ओळखला जातो. या दिनाच्या निमित्ताने शिवप्रेमींनी ठिकठिकाणी शिवप्रतापाचा जागर केला.
करवीर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. या वेळी तेथील परिसर आकर्षक रांगोळ्या आणि फुले यांनी सजवण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी चौकाची गेल्या २० वर्षांपासून स्वच्छता करणार्‍या स्वच्छता कर्मचारी मीना रमेश रुईकर यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सायंकाळी युद्धकलांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, सर्वश्री संभाजी साळुंखे, उदय भोसले, अवधूत भाट्ये, अमोल माने यांसह अन्य उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleकोरूना च्या पार्श्वभूमीवर माळेगावची खंडोबा यात्रा रद्द. केवळ देवस्वारी पूजन व मंदिरातील पारंपारिक कार्यक्रम यंदा होणार..
Next articleशिष्यवृत्ती व स्वाधार योजनेस प्रारंभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here