Home जालना गजानन तौर हत्या प्रकरणांतील आरोपी विलास पवार उर्फ टायगर पोलिसांच्या ताब्यात

गजानन तौर हत्या प्रकरणांतील आरोपी विलास पवार उर्फ टायगर पोलिसांच्या ताब्यात

179
0

आशाताई बच्छाव

IMG_20240406_202820.jpg

गजानन तौर हत्या प्रकरणांतील आरोपी विलास पवार उर्फ टायगर पोलिसांच्या ताब्यात
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख

याविषयी सविस्तर माहिती अशी की, जालना शहरातील मंठा चौफुली येथे दिनांक 11 /12 /2023 रोजी दुपारी ठीक दोन वाजेच्या सुमारास गावठी पिस्तूल ने फायर व चाकूने वार करून गजानन मच्छिंद्रनाथ तौर यांचा भर दिवसा खून केला होता. या प्रकरणात पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये यातील आरोपींना संघटितपणे एकत्र येऊन सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्ह्यामध्ये कलम 3(1) ( i ) (ii),3 (2),3(4) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोक्का )लावण्यात आले असून मोकाचे कलम लावल्यानंतर गुण्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी हे करीत आहेत. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये गजानन मच्छिंद्रनाथ तौर याचे मारेकरी पाच आरोपी पैकी तीन आरोपी1) भागवत विष्णू डोंगरे, 2) लक्ष्मण किसन गोरे,3) रोहित नरेंद्र ताटीपामुलवार यांना अटक करून तपास करण्यात आला आहे.
यातील फरार व कुख्यात गुंड विलास देविदास पवार उर्फ टायगर याचा शोध घेणे कामी पोलीस ठाणे तालुका जालना व स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. आरोपी विलास हा बिदर (कर्नाटक) येथे असल्याची बातमी विशेष पथकास मिळाल्यानंतर त्यांनी बिदर (कर्नाटक) येथे जाऊन माहिती काढली असता आरोपी तेथून पसार झाला. त्यानंतर या आरोपीचा शोध विशेष पथकाने कर्नाटक राजस्थान व पंजाब या राज्यात घेतला. आरोपी अमृतसर (पंजाब) येथे असल्याची माहिती मिळाल्याने हे विशेष पथक अमृतसरला पोहोचले तेथे सतत तीन दिवस शोध घेतला असता तो अमृतसर येथे मिळून आला नाही. पुन्हा गोपनीय यंत्रणा कार्यान्वित करून माहिती घेतली असता तो बिदरला गेल्याची माहिती मिळाली विशेष पथक पुन्हा बिदरला पोहोचले बिदर येथे शोध घेतला असता आरोपी तेथूनही पसार झाला होता. आरोपी ज्या लोकांच्या संपर्कात होता त्यांची गोपनीय माहिती काढून तो संपर्कात असलेल्या काही लोकांची माहिती मिळाली. त्या लोकांकडे सखोल तपास केला असता आरोपी पुन्हा अमृतसरलाच असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली या पोलीस पथकाने पुन्हा अमृतसरला रवाना होऊन शोध घेतला असता सुमारे चार ते पाच दिवसांच्या अथक परिश्रमानंतर आरोपी अमृतसर येथून ताब्यात घेण्यास पोलिसांना यश मिळाले. आरोपी हा आपले नाव व ओळख लपवून व नाव बदलून तसेच बदललेल्या नावाची ओळखपत्रे बनवून विविध राज्यात वास्तव्य करत होता. त्यामुळे त्यास अटक करण्यामध्ये अडचणी येत होत्या.
आरोपी बाबत गोपनीय माहिती प्राप्त करणे त्यांचे पृथक्करण करणे कर्नाटक, पंजाब या राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय राखून योग्य मदत त्या ठिकाणी मिळवून देण्याचे काम पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी व तपास अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांनी केले.
सतत वीस दिवस जालना बिदर, अमृतसर बिदर ,अमृतसर जालना असा सुमारे 9600 किलोमीटरचा प्रवास करून आरोपीच्या मागावर असलेल्या विशेष पथकातील श्री के.ए. वनवे पोलीस उपनिरीक्षक तालुका जालना, विलास आटोळे, शॅम्युअल कांबळे, सचिन चौधरी ,लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत माळी यांनी चिकाटीने प्रयत्नांची पराकाष्टा करून आरोपीस अटक केले आहे. या मोहिमे दरम्यान तांत्रिक सहाय्य पोलीस अंमलदार सागर बाविस्कर ,जावेद शेख, हारुण पठाण, रामेश्वर कुऱ्हाडे यांनी पुरवले.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली श्री रामेश्वर खनाळ पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, श्री एस. आर. उनवणे पोलीस निरीक्षक तालुका जालना व विशेष पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले.
तसेच पोलीस अधीक्षक जालना श्री अजय कुमार बंसल व अप्पर पोलीस अधीक्षक जालना श्री आयुष नोपाणी यांनी पदभार स्वीकारले पासून जालना जिल्ह्यातील कुख्यात व सराईत गुन्हेगाराविरुद्ध कठोर धोरण अवलंबिवली असून संघटित गुन्हेगारी व कुख्यात गुंडाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई मोहीम हाती घेतली आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून या आरोपीस अटक केली आहे.
सदरील आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध जालना व नांदेड जिल्ह्यात आणि पंजाब राज्यांमध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत अक्र.1)पोस्टचे.सेवली जालना. गुरनं.53/2022कलम302,120(ब),143,147,148,149 भादंवी.सह कलम 3/25,3/27 भआहकआ.
वजीराबाद नांदेड गुरनं.143/2017कलम115,120(ब) भादंवि.सह कलम 3/25,2/27,(2),7,4/25भाहका.
वजीराबाद नांदेड गुरनं 67/2018कलम 3/25,3/27(2)4/25भाहका.सह कलम 7 क्रिमिनल लाॅ अमेंटमेंट ॲक्ट.
वजीराबाद नांदेड276/2019, कलम 307,109,120,(बं)34भादंवि.सह कलम 3/25,327(2)भाहका.
इतवारा नांदेड 326/2020कलम 3/25भाहका .34भादंवि.
131/2021कलम 392,201,34भादंवि सह कलम 3/25भाहका.426/2023कलम 307,34 भआदंवइ सह कलम 3/25भाहका ,22/2024कलम 3/25भाहका,802/2023कलम 302,143,144,147,148,149भादंवि.सह कलम 3/25 भाहका.सह कलम 135मपोका यांसह आरोपी विरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 8483951442/9763966560

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here