Home माझं गाव माझं गा-हाणं नाशिकच्या शिक्षणाधिकारी ललिता वीर लाच घेताना रंगेहाथ अटक

नाशिकच्या शिक्षणाधिकारी ललिता वीर लाच घेताना रंगेहाथ अटक

260
0

राजेंद्र पाटील राऊत

नाशिक -(राजेंद्र वाघ  प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा

कार्यादेश काढून देण्याकरिता ८ लाखांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली पंकज वीर यांच्या वाहन चालकास ठाणे येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरिता राजेवाडी येथील प्राथमिक शिक्षक पंकज रमे दशपुते यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांचेसाठी ९ लाखांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी पडताळणी केली असता वैशाली वीर यांना तडजोडी अंती ८ लाख रुपये देण्याचे ठरले. काल मंगळवार दि.१० ऑगस्ट रोजी वैशाली वीर यांचे वाहनचालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले यांना वीर यांचेसाठी ८ लाख रुपये स्वीकारताना ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

याकामी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्रीमती पल्लवी ढगे पाटील यांचेसह पोहवा मोरे , लोटेकर पोना शिंदे, अश्विनी राजपूत, पोशी सुतार, पोहवा शिंदे या पथकाने कारवाई केली.

Previous article🛑 खेड तालुक्यातील चोरवणे गडकरवाडी, शिंदे गावठण आणि सुतारवाडी मधील शेतकऱ्यांची शेती गेली वाहून 🛑
Next articleपेठ वडगाव ता हातकणंगले येथील माऊली युवा मंचच्या वतीने कोरोना च्या पाश्वभूमी मुळे सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केले होते
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here