Home पुणे भंडारा येथील नवजात शिशू दुर्घटना : आग प्रकरणी सुरू केलेली चौकशी नि:पक्षपणे...

भंडारा येथील नवजात शिशू दुर्घटना : आग प्रकरणी सुरू केलेली चौकशी नि:पक्षपणे होईल असा विश्वास वाटतो – ना.डॅा.नीलम गोऱ्हे, महाराष्ट्र विधानपरिषद,उपसभापती

109
0

राजेंद्र पाटील राऊत

भंडारा येथील नवजात शिशू दुर्घटना : आग प्रकरणी सुरू केलेली चौकशी नि:पक्षपणे होईल असा विश्वास वाटतो – ना.डॅा.नीलम गोऱ्हे, महाराष्ट्र विधानपरिषद,उपसभापती

(सिध्दांत चौधरी/विलास पवार युवा मराठा न्युज नेटवर्क)
दि.११ पुणे:- भंडारा मधील नवजात शिशुंचा झालेला अंत हा अत्यंत दुःखदायक, क्लेशदायक आणि अस्वस्थ करणारा आहे. या दुर्दैवी घटने मध्ये जे जबाबदार असतील,ज्यांनी हलगर्जीपणा केला असेल किंवा काही तांत्रिक प्रश्न झाला असेल त्याच्या चौकशीचे आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेले आहे. माननीय मुख्यमंत्री आज भंडारा येथील शासकीय रुग्णालय येथे गेलेले होते. त्यांनी या संपूर्ण घटनेची चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी योग्य पद्धतीने नक्की होईल.
या घटनेमध्ये गेलेल्या लहान जीवांची भरपाई कशानेही होत नाही ही वस्तुस्थिती आहे. या परिस्थितीत कोणीही टीका करू नये. तरीही होणाऱ्या टीकेवर बोलायचे तर महापुरामध्ये सांगलीला अनेक जणांनी पुराच्या पाण्यात स्वतःच उड्या मारून, पोहून,त्याचेच फोटोशूट करण्याची संवेदनहीनता दाखवली होती. अशा राजकीय व्यक्तींनी याबद्दल काही टीका करून राजकारण केले तर मला असं वाटते की जनताच ह्या राजकीय टीकेला नक्कीच योग्य पद्धतीने उत्तर देईल .
कोरोनाामुळे सगळेच मोठ्या जबाबदारीत होते व आपल्या आरोग्य यंत्रणा वर प्रचंड भार होता अशा वेळेला काही डॉक्टर्स, नर्सेस, अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःचे जीव गमावलेले आहेत. सरकार या घटनेची चौकशी योग्य व नि:पक्षपणेच करेल याबद्दल सर्वांनी विश्वास ठेवावा.
मला असं वाटते की ज्याच्यावर हा दुःखद प्रसंग ओढवला आहे त्या कुटुंबियांची उद्धवजींची आजची भेट उपयुक्त ठरेल व या कुटुंबियांना नक्कीच या दुःखातून सावरण्यासाठी शासन त्यांच्याबरोबर आहे हा विश्वास मिळाला असेल. राज्यातील सर्व हॉस्पिटल व्यवस्थापकना मला सुचवावेसे वाटते की रुग्णाबरोबर हॉस्पिटलमध्ये 2-3 पालकांना कक्षाच्या बाहेर बसण्याची परवानगी द्यावी. यामध्ये संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. ह्या पालकांची काही वेळा आपत्तीच्या प्रसंगात मदत होईल.

Previous articleव्हॉट्सअपची नवीन पॉलिसी
Next articleनाशिक हादरले अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार सर्वत्र संताप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here