• Home
  • नाशिक हादरले अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार सर्वत्र संताप

नाशिक हादरले अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार सर्वत्र संताप

राजेंद्र पाटील राऊत

navbharat-times.jpg

नाशिक हादरले अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार सर्वत्र संताप
(राजेंद्र वाघ/विष्णू अहिरे युवा मराठा न्युज नेटवर्क)
नाशिक- महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत.एका बाजुला शासन वेगवेगळे कायदे बनवून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाऊले उचलत असतानाच नाशिक मध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
अत्याचारित १३ वर्षिय मुलीचे आईवडील मोलमजूरीसाठी गेलेले असताना,नाशिकरोडच्या अरिंगळे मळ्याजवळील सात आरोपीनी या अल्पवयीन मुलीवर अनन्वीत अत्याचार करुन बलात्कार केल्याच्या घटनेमुळे नाशिक पुरते हादरुन गेले आहे.या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे,नाशिकरोड पोलिस ठाण्यात या सगळ्या आरोपीविरुध्द विविध कलमाखाली गुन्हे दाखल करुन त्या सर्वाना अटक करुन न्यायालयापुढे काल रविवारी हजर केल्यावर त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अधिक तपास नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरज बिजली हे करीत आहेत.

anews Banner

Leave A Comment