Home बीड अंबाजोगाईतील निवासी डॉक्टरांचे दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन

अंबाजोगाईतील निवासी डॉक्टरांचे दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240225_072056.jpg

अंबाजोगाईतील निवासी डॉक्टरांचे दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/अंबाजोगाई दि: २४  येथील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन वाढ झाली पाहिजे. त्यांना राहण्यासाठी नवीन वस्तिगृह मिळालेच पाहिजे. अशा विविध मागण्यांसाठी शुक्रवार पासून निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याचा फटका स्वा.रा.ती रुग्णालयातील रुग्णसेवेला बसला आहे, परिणामी रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी सकाळी स्व.रा.ती रुग्णालयाच्या ओपीडी समोर घोषणाबाजी व निदर्शने करण्यास करत निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी काम बंद आंदोलनात स्व.रा.ती मधील निवासी डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. बाहय रुग्ण विभागातील सेवा बंद केल्या आहेत. या कामबंद आंदोलनात मानवतेच्या दृष्टीकोनातून अत्यावश्य रुग्णांची म्हणून हेळसांड होऊ नये तातडीच्या अत्यावश्यक सेवा जसे की अपघात विभाग, आय सी यु व तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू ठेवल्या आहेत. स्वरातीमधील निवासी डॉक्टरांनी सकाळ पासून बाह्य रुग्ण विभागासमोर एकत्र येत घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली. निवासी डॉक्टरांना विद्यावेतन वाढ, मिळालीच पाहिजे, नवीन वस्तिगृह मिळालेच पाहिजे, मार्ड एकजुटीचा, असो अशा घोषणा दिल्या. जोपर्यंत विद्यावेतन वाढीचा मंत्रिमंडळ निर्णय होत नाही. आणि नवीन वस्तीगृह मंजुरीचा आदेश मिळत नाहीत. तोपर्यंत आंदोलन कायम करण्याचा इशारा मार्ड अध्यक्ष तथा राज्य सचिव डॉ.राहुल मुंडे यांनी दिला.

Previous articleदेवरगावला योगीराज हरे कृष्ण विद्यालयातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप
Next articleखऱ्या कलावंतांना मानधनाचा लाभ मिळवून देणार- समाज कल्याण सभापती मदनभाऊ रामटेके
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here