Home बुलढाणा वानखेड ते रिंगणवाडी रस्त्याचे खडीकरण करा. अन्यथा संघर्ष पेटणार! प्रशांत डिक्कर.

वानखेड ते रिंगणवाडी रस्त्याचे खडीकरण करा. अन्यथा संघर्ष पेटणार! प्रशांत डिक्कर.

140

आशाताई बच्छाव

IMG-20220928-WA0017.jpg

वानखेड ते रिंगणवाडी रस्त्याचे खडीकरण करा. अन्यथा संघर्ष पेटणार! प्रशांत डिक्कर.

स्वप्निल देशमुख

संग्रामपूर/ तालुक्यातील वानखेड ते रिंगणवाडी रस्त्याचे तत्काळ खडीकरण काम चालू करा अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यु पि.बुरजे यांचेकडे निवेदनातून केली आहे. वानखेड रिंगणवाडी रस्त्या लगत हजारो एक्कर सुपिक जमीन आहे.पंरतु रस्ता चिखलमय असल्यामुळे बैलबंडी या कोणत्याही प्रकारचे वाहन जावु शकत नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीमालाची रस्त्याने वाहतूक करता येत नसल्याने सर्व माल शेतातच सडुन जात आहे. याचा सर्व भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.
तसेच रिंगणवाडी ते वानखेड गावाचे अंतर कमी असल्याने सर्व रुग्ण वानखेड आरोग्य केंद्रात उपचार घेत होते. पंरतु रस्त्या अभावी येथिल रुग्णांची गैरसोय होते वेळेवर उपचार मिळु शकत नाही. त्यामुळे या रस्त्याचे तत्काळ खडीकरण करण्यात यावे अन्यथा परिणामाची चिंता न करता संघर्ष अटळ आहे. असा ईशारा स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी स्वाभिमानीचे विलास तराळे, वासुदेव कु-हाडे, मनोज पालीवाल, राजेंद्र ढगे, शहादेव भोपळे, सुरेख सांगळे, जगन्नाथ कु-हाडे, जगन्नाथ हागे, संतोष अमझरे, नारायण मिसाळ, कैलास बघे, उमेश मिसाळ, आनंद हागे, पप्पू चांडक, गजानन म्हस्के, मोहन हागे, प्रल्हाद हागे, मनोज हागे, राहुल हागे, अमोल रौंदळे, गजानन मस्के, मोहन हागे,आनंद हागे,प्रवीण रौदळे, राहुल डांबरे, विठ्ठल कुरवाडे, हरीदास अमझरे, राजेन्द्र हागे, यांच्या सह वानखेड येथिल बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Previous articleशहीद भगतसिंग यांची ११४ वी जयंती उत्साहात साजरी
Next articleमदनुर, देगलुर, मरखेल पोलीसांची सयुंक्त धाडसी कामगिरीआंतरराज्य जनावरे चोरी करणारी टोळी जेरबंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.