• Home
  • अंतिम वर्षांच्या परीक्षा संदर्भात शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय… मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

अंतिम वर्षांच्या परीक्षा संदर्भात शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय… मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 अंतिम वर्षांच्या परीक्षा संदर्भात शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय…🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 20 जून : ⭕ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी परीक्षेबाबत सगळ्या शंका दुर केल्या होत्या मात्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सादर केलेल्या परपत्रकामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता, तो दूर करण्यासाठी आज पुन्हा राज्याते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांनी सोशल मिडीयावर लाईव्ह येऊन आपले निर्णय आणि नवे बदल सांगितले आहेत.

इथूनपुढे परीक्षांते तीन टप्पे असणार आहेत, ते म्हणजे अव्यवसाईक अभ्यासक्रमात मोडणारे विद्यार्थी, व्यवसाईक अभ्यासक्रम आणि या दोन्हीमध्ये असलेले एटीकेटी किंवा बॅकलॉकमध्ये मोडणाऱ्या विद्यार्थ्यांचा तीसरा टप्पा असे प्रकार करण्यात आले आहेत.

या विद्यार्थ्यांसाठी मागील सर्व सत्रात उत्तिर्ण झालेल्या सर्व अंतिम टप्प्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास, तसे विद्यार्थ्यांकडून लेखी घेऊन निकाल घोषित करावा. त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावीशी वाटत आहे, त्यांनी तशाप्रकारे लेखी अर्ज विद्यापिठाकडे देणे बंधणकारक असेल. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावीशी वाटत नाही, तशाप्रकारच्या विद्यार्थ्यांनीही पत्र विद्यापीठाकडे देणे गरजेचे आहे.

व्यवसाईक अभ्यासक्रम, म्हणजे अभियांत्रीकी, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापन शात्र, वास्तूकला, संगणक शास्त्र, अद्यापन शास्त्र अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी जर त्यांना हवं असल्यास ऐच्छिकरित्या परीक्षा द्यावी नाहीतर ते मागच्या रेकॉर्डनुसार पदवी प्रधान करू शकतात. या सगळ्यात अव्यवसाईक विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत, त्या रद्द करण्यात येतील असा निर्णय उदय सामंत यांनी स्पष्ट केला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment