• Home
  • माणच्या सुपुत्रांचा एमपीएससीत बोलबाला! ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

माणच्या सुपुत्रांचा एमपीएससीत बोलबाला! ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 माणच्या सुपुत्रांचा एमपीएससीत बोलबाला! 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

दहिवडी :⭕ माण तालुका ही बुध्दीवंतांची खाण आहे, हे पुन्हा एकदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आजच्या निकालाने सिध्द केले. तालुक्यातील पाच जणांची अधिकारीपदी निवड झाली आहे. यामध्ये लोधवडेचा चैतन्य कदम पोलिस उप अधीक्षकपदी, पळशीचा विकास गंबरे तहसिलदार, गोंदवले बुद्रुकची प्रगती कट्टे व जाधववाडीचे प्रवीण जाधव यांची नायब तहसिलदार, तर दहिवडीची गौरी कट्टे हिची कक्ष अधिकारीपदी निवड झाली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत नाद नाय करायचा माणच्या पोरांचा असंच म्हणावं लागेल.

माण तालुका दुष्काळी असला तरी येथे बुध्दीवंतांची खाण असल्याचे बोलले जाते. आतपर्यंत अनेक सनदी अधिकारी या तालुक्याने राज्याला दिले आहेत.
यामध्ये आजपर्यंत खंड पडलेला नाही. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा निकाल जाहिर झाला.

यामध्ये माण तालुक्यातील तीन युवक व दोन युवती यशस्वी झाल्या आहेत. यामध्ये लोधवडे गावचे सुपुत्र चैतन्य कदम यांची पोलिस उप अधीक्षकपदी निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण माणमध्येच झाले असले तरी चैतन्य कदम यांनी राहुरी येथून कृषीची पदवी मिळवलेली आहे. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परिक्षा देण्यास सुरुवात केली. मागील वर्षी त्यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त पदी निवड झाली होती. मात्र तेवढ्यावर समाधान न मानता त्यांनी प्रयत्न पुन्हा परिक्षा देणे सुरुच ठेवले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन आज त्यांची पोलिस उप अधीक्षकपदी निवड झाली आहे.

पळशी येथील विकास गंबरे यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे. त्यांचे शिक्षण पळशी, म्हसवड, सातारा येथे झाले आहे. तसेच त्यांनी अभियांत्रिकीची पदवी पुणे येथून घेतली आहे. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेत आपले लक्ष घातले. २०१८ मध्ये त्यांची सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झाली होती. त्यानंतरही त्यांनी आपले प्रयत्न सुरुच ठेवले. त्यामुळेच आज त्यांनी उज्वल यश मिळविले व त्यांची तहसिलदारपदी निवड झाली.
गोंदवले बुद्रुकच्या प्रगती कट्टे यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गोंदवले बुद्रुक येथेच झाले तर. उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय दहिवडी येथे झाले. मुंबई येथे त्यांनी अभियांत्रिकी पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली. आज जरी नायब तहसीलदार पदी निवड झाली असली तरी एवढ्यावरच न थांबता क्लास वनचे पद मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रगती यांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या प्रगती या बहिण आहेत.

माण पंचायत समितीचे उपसभापती तानाजी कट्टे यांची कन्या गौरी कट्टे यांची कक्ष अधिकारी पदी निवड झाली आहे. त्यांचेही प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण गोंदवले व दहिवडी येथे झाले आहे. तर त्यांनी सातारा येथे बी.सी.एस. केले आहे. त्यानंतर त्या स्पर्धा परीक्षांकडे वळल्या. कक्ष अधिकारीपदी निवड झाली असली तरी हे यश त्यांना समाधान देणारे नाही, असे सांगतानाच अजून उच्च पदस्थ अधिकारी होण्याचा निर्धार गौरी कट्टे यांनी व्यक्त केला.
तसेच माण तालुक्यातील जाधववाडी येथील प्रवीण जाधव यांची नायब तहसिलदारपदी निवड झाली आहे. एकाचवेळी पाच जणांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविल्याने माण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे…⭕

anews Banner

Leave A Comment