Home Breaking News मालिका कलाकारांच्या मानधनात होणार मोठी कपात मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ...

मालिका कलाकारांच्या मानधनात होणार मोठी कपात मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

83
0

🛑 मालिका कलाकारांच्या मानधनात होणार मोठी कपात🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 20 जून : ⭕ लॉकडाउनमुळे तीन महिने बंद राहिलेल्या मनोरंजनसृष्टीच्या अर्थकारणावरही जबर परिणाम झाला आहे. मालिकांच्या बजेटमध्ये जवळपास ३० टक्के कपात करुन काम करण्याच्या सूचना वाहिन्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे मुख्य कलाकारांपासून इतर कलाकार-तंत्रज्ञांपर्यंत सर्वांच्याच मानधनात घसघशीत कपात होण्याची चिन्हं आहेत.

तीन महिन्यांपासून बंद असलेल्या टीव्ही इंडस्ट्रीने पुन्हा एकदा सेटवर पोहोचण्याची तयारी सध्या सुरू केली आहे. फिल्मसिटीमध्ये शूटिंगला परवानगी दिल्यानंतर निर्माते २३ जूनपासून नव्या मार्गदर्शक सूचनांसह चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, टीव्ही वाहिन्यांनी आपल्या निर्मात्यांना त्यांच्या मालिकांचं बजेट कमी करण्यास सांगितलं आहे. याचा परिणाम म्हणून निर्माते कलाकारांसह संपूर्ण टीमच्या मानधनाला कात्री लावण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. तथापि, ‘सिन्टा’ आणि ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ संघटनांनी या कपातीला विरोध दर्शवला आहे. अगोदरच कर्माचारी आणि छोटे कलाकार हे आर्थिक संकटात आहेत. त्यात जर त्यांना मानधन कमी मिळाल्यास ते योग्य ठरणार नाही; असं फेडरेशनचं म्हणणं आहे.

ओव्हरटाइमही नाही! मानधन कपातीबाबत सिंटाचे सहसचिव अमित बहल सांगतात, ‘आमची मागणी स्पष्ट आहे की दरमहा सर्व कर्मचाऱ्यांना आणि कलाकारांना पैसे मिळायला हवेत. रोजगारावर कर्मचाऱ्यांना दिवसाचं मानधन मिळावं. आम्ही आठ तासांपेक्षा जास्त शूटिंग करणार नाही. आम्हाला योग्य विमा आणि मेडिक्लेम दिले जावेत. आम्ही कोणत्याही प्रकारच्या पगार कपातीसाठी तयार नाही. आम्ही यावर ठाम आहोत आणि या विषयावर फेडरेशन आमच्यासोबत आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्यानं वैयक्तिक पातळीवर कमी मानधनात काम केलं, तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु जर एखादा सदस्य आम्हाला सांगत असेल की त्याचा पगार जबरदस्तीनं कमी केला जात असेल तर सिन्टा आणि फेडरेशन एकत्रितपणे त्या संबंधित निर्मात्यावर कारवाई करेल.

सीसीआयनं स्पष्टपणे सांगितले आहे की, निर्माते त्यांना हव्या असलेल्या कर्मचाऱ्यांसह काम करू शकतात. केवळ आपल्याच सदस्यांना काम मिळावं यासाठी फेडरेशन निर्मात्यांवर दबाव आणू शकत नाही. म्हणून फेडरेशनने त्यांची मनमानी थांबवावी. – टीपी अग्रवाल, अध्यक्ष, इम्पा⭕

Previous articleअंतिम वर्षांच्या परीक्षा संदर्भात शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय… मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
Next articleनातू गमावल्यानंतरही आजीने राखले समाजभान; गृहमंत्री झाले नतमस्तक ✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here