Home पालघर जव्हार मध्ये,उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन साजरा...

जव्हार मध्ये,उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन साजरा —-उध्दव ठाकरे गट शिवसैनिकांकडून जल्लोष. शिवसेनेचा बहरता वटवृक्ष

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20230619-WA0042.jpg

जव्हार मध्ये,उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन साजरा
—-उध्दव ठाकरे गट शिवसैनिकांकडून जल्लोष.
शिवसेनेचा बहरता वटवृक्ष                                  पालघर

जव्हार शहरात १९जून २०२३ हा शिवसेना पक्षाचा ५७ वा वर्धापन दिन शहरातील गांधी चौक येथे दिमाखात पार पडला. ह्या वर्धापन दिनानिमित्त असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून शिवसेनेचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उप तालुका प्रमुख चित्रांगण घोलप यांनी शिवसेनेचा इतिहास शिवसैनिकांसमोर मांडला.त्यात शिवसेनेची स्थापना कशी झाली? कोणत्या बिकट परिस्थितीतून शिवसेना कशी ठाम उभी राहिली याचे विस्तृत वर्णन चित्रांगण घोलप यांनी केले. सन- १९६६ साली महाराष्ट्रात हिंदू हृदयसम्राट बाळा साहेब ठाकरेंनी शिवसेना पक्ष उभारला. त्यावेळी अवघ्या १५ कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची मुहूर्तमेढ रोवली.त्या अंकुराचा आता शिवसेना पक्षाचा बहरता वटवृक्ष झाला आहे.बदलत्या काळात शिवसेनेची समिकरणे,ध्येय,धोरणे बदलत गेली.परंतु शिवसेना पक्ष आजच्या घडीला हि टिकून आहे.बाळासाहेबांचे विचार आजच्या शिवसैनिकांना सदैव प्रेरणा देतात. नजीकच्या काळात शिवसेनेत राजकीय स्थितत्तरे झाली.परंतु बाळासाहेबांच्या विचारांची नाळ तरुणांशी जुळली आहे.
यावेळी गांधी चौकात जेष्ठ शिवसैनिक अनिल तमोरे यांच्या हस्ते भगवा ध्वजा रोहण करण्यात आले. ह्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन शिवसेनेचे शहर प्रमुख परेश पटेल यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी विक्रमगड विधानसभा समन्वयक विजय आंभिरे, तालुका प्रमुख श्रावण खरपडे,उपशहर प्रमुख साईनाथ नवले, हितेंद्र चोथे, पप्पू सावंत, जनकल्याण पतसंस्थेचे संचालक अनिल दवणे ,नरेश महाले मा.उप शहर प्रमुख निलेश फलटणकर,युवा सेनेचे सागर जाधव, अभिषेक यादव तसेच वाहतूक सेनेचे अध्यक्ष अमित आयरे, नितीन कदम,मयूर पहाडी मुस्लिम विभागाचे शकील कुनमाळी ,आसिफ घाची,अझर फरास,अन्नू आत्तार आदी.शिवसैनिक कार्यक्रमास उपस्थित होते.अखेर वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता होऊन सर्व शिवसैनिकांना पेढे वाटून वर्धापन दिनाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

Previous articleआदिवासी विकास प्रकल्प की भाजपा विकास प्रकल्प -सरपंच एकनाथ दरोडा
Next articleवरळी विधानसभेतील गुणवंत विद्यार्थ्यांना १२ लॅपटॉप व ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here