🛑 मुंबईचा एकही प्रवासी रेल्वेतून उतरला नाही 🛑
महाराष्ट्र 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी )
सोलापूरः⭕ रेल्वे खात्याने सुरू केलेल्या रेल्वे गाड्यांपैकी पहिली रेल्वे सोमवारी (ता. 1) सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाली. मुंबई ते बंगळुरु ही उद्यान एक्स्प्रेस सायंकाळी चार वाजता दाखल झाल्यानंतर मुंबईहून कुणी प्रवासी आले का याची चिंता उपस्थित यंत्रणेला पडली होती. या पुर्वी जिल्हाभरात मुंबईच्या कोरोना संशयिताचा अनुभव पाहून त्यांना ही भिती पडली होती. माक्ष प्रत्यक्षात एकही प्रवासी सोलापुर स्थानकावर उतरलाच नाही. तेव्हा मुंबईच्या संकटातुन सुटल्याने सर्वानी निःश्वास सोडला.
