Home नाशिक मनपा शिक्षणधिकारी अन् लिपिक ACBच्या जाळ्यात; ५० हजाराची लाच घेताना अटक

मनपा शिक्षणधिकारी अन् लिपिक ACBच्या जाळ्यात; ५० हजाराची लाच घेताना अटक

94
0

आशाताई बच्छाव

IMG-20230602-WA0048.jpg

मनपा शिक्षणधिकारी अन् लिपिक ACBच्या जाळ्यात; ५० हजाराची लाच घेताना अटक

भास्कर देवरे युवा मराठा न्यूज नेटवर्क

नाशिक : निलंबित मुख्याध्यापकाला कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी ५५ हजारांची लाच मागणाऱ्या नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह शिक्षण विभागाचे लिपिक नितीन जोशी यांना एसीबीने (ACB) लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे…
यामुळे नाशिक महानगरपालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल ५५ हजारांची लाच स्वीकारताना दोघांना अटक करण्यात आली आहे. धनगर यांना ताब्यात घेतले असून सध्या त्यांची एसीबीकडून चौकशी सुरु करण्यात आली. यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

एका निलंबित मुख्याध्यापकाला कामावर पुन्हा रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी सुनीता धनगर (५७, रा. ८०१ रचित सनशाइन उंटवाडी नाशिक (वर्ग-२) आणि नितीन जोशी (४५, रा. फ्लॅट नंबर ८, पुष्पांकुर अपार्टमेंट, चव्हाण नगर, तपोवन, नाशिक (वर्ग -३) यांनी दोघांनी एकूण ५५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. शिक्षणाधिकारी धनगर या ५० हजार रुपये आणि लिपिक जोशी हे ५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

Previous articleकरंजगावच्या गोदापात्राने घेतला मोकळा श्वास खंडू बोडके-पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश–
Next articleयुवा मराठा पत्रकाराचे “अनुभवाचे बोल”
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here