• Home
  • *शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची* *कामे जलद*

*शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची* *कामे जलद*

*शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची* *कामे जलद*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री असल्याने त्यांच्या पक्षातील आमदारांची कामे पटापट होतात, पण शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना हवी तशी गती मिळताना दिसत नाही, अशी तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शिवसेना आमदारांच्या या तक्रारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
‘तीन पक्षांचे सरकार म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या अपेक्षा निश्चितपणे वाढलेल्या असतात. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती बघता सर्वांचेच कामं पूर्ण होतील, असं वाटत नाही’, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
अजित पवार हे असं नेतृत्व आहे जे विरोधी पक्षातील आमदार आले तरी त्यांचेही कामं करतात. तसं भाजप सरकारच्या काळात होत नव्हतं. महाविकास आघाडीत शिवसेना-राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे आमदार असोत, कोणत्याही आमदाराचं काम अजित दादांकडे आलं असेल तर ते निश्चितच होतं. अजित पवार यांनी आऊट ऑफ वे जाऊनदेखील कामे केलेली आहेत’, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला
विरोधी पक्षाच्या आमदारांचीदेखील कामे करणारा नेता म्हणून अजित पवारांची ओळख आहे. एखाद-दुसऱ्या आमदाराचं काम झालं नसेल तर त्याने तक्रार केली असेल. पण महाविकास आघाडीमध्ये अशी कोणतीही कुरबुर आहे, असं मला वाटत नाही’, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली.

anews Banner

Leave A Comment