Home Breaking News *मुख्यमंत्र्याना पाच लाख पत्रे पाठवणार.*

*मुख्यमंत्र्याना पाच लाख पत्रे पाठवणार.*

132
0

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

दूध दरवाढीबाबत राज्य सरकार सकारात्मक नाही. आंदोलन केल्यानंतरही सरकारने काहीच निर्णय घेतला नसल्याने भाजपसह मित्र पक्षांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांना पाच लाख पत्रे पाठवून दूध दरवाढीची मागणी करणार,’ अशी माहिती माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, दूध दरावरून राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून दिशाभूल करीत असल्याचा आरोपही आमदार खोत यांनी केला.
राज्यात गायीच्या दुधाला सध्या प्रतिलिटर १६ ते २० रुपये दर मिळत आहे. प्रतिलिटर ३० रुपयांवरील दरात मोठी घट झाल्याने दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले आहे. या स्थितीत राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे आणि दूध भुकटीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी भाजपसह मित्र पक्षांनी केली आहे.
या मागण्यांसाठी त्यांनी २० जुलै आणि एक ऑगस्टला राज्यभर आंदोलन केले. आंदोलनानंतरही दूध दरात वाढ झाली नसल्याने विरोधक आक्रमक बनले आहेत.
याबाबत भाजप आणि मित्र पक्षांच्या नेत्यांची मंगळवारी ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाची माहिती देताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, ‘दूध दराबाबत भाजप आणि मित्रपक्षांची राज्यव्यापी बैठक झाली. या बैठकीत आम्ही आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनाच्या तिस-या टप्प्यात १३ ते १८ ऑगस्ट दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रांद्वारे संदेश पाठवला जाईल. यासाठी राज्यभरातून पाच लाख पत्रे पाठवली जाणार आहेत.
राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. ठराविक दूध संघांचेच दूध घेतले जाते. यातून दूध उत्पादक शेतकऱ्याला एकही रुपया मिळणार नाही. राज्यात ५० हजार मेट्रिक टन दूध भुकटी शिल्लक आहे. याच्या निर्यातीचा निर्णय कधी होणार? सरकारमधील नेत्यांनीच शेतकऱ्यांचा कडेलोट केला आहे. हे सरकार करोनाचे भूत प्रत्येकाच्या मानगुटीवर बसवत आहे. सामान्य जनतेचा आवाज हे सरकार दाबत आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here