देगलूर ता.ग्राम पंचायती अंतर्गत पंतप्रधान आ.यो.साठी आधार लिंक करीता १०० रू.ची लुट करणाऱ्या कंप्युटर आॕपरेटर्स वर कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा तिवृ आंदोलन छेडु ; अशोक कांबळे, विकास नरबाग, अ. हसनाळकर –
नांदेड,दि. १२ ; राजेश एन भांगे
शासनाने पंतप्रधान आवास योजने करीता आधार लिंक करण्याचे जाहिर केले असता
मात्र त्याचाच फायदा घेवुन
देगलूर तालुक्यातील ग्राम पचायती अंतर्गत कार्यरत असलेले कंप्युटर आॕपरेटर्स हे तेथील प्रत्येक भोळ्या बाभड्या शेतकरी, कष्टकरी व तसेच वंचित लोकांकडुन प्रधानमंत्री आवास योजने करीता लागत असलेल्या आधार लिंक करण्यासाठी प्रत्येक नागरिकां कडुन जबरदस्ती विनाकारण १०० रूपयाची वसुली करीत आहेत. तरी या कंप्युटर आॕपरेटर्स (लुटारूं) कडुन सर्व सामान्य नागरिकांची होणारी लुट हि गंभीर बाब असुन.
या प्रकरणा मध्ये संबधित प्रशासकीय अधिकारींने तत्काळ लक्ष घालून पंतप्रधान आवास योजनेसाठी लागणाऱ्या आधार लिंकसाठी १०० रूपयाची वसुली करून जनतेला लुटणाय्रा (ग्राम पंचायतीत कार्यरत असलेल्या) आॕपरेटर्स वर त्वरीत कायदेशीर कठोर कार्यवाही करावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराच अशोक कांबळे, विकास नरबाग, व अनिल हसनाळकर यांनी – देगलूर पंचायत समिती, गट विकास अधिकारी यांना निवेदना व्दारे दिले.