• Home
  • इचलकरंजीच्या उद्योगपतीवर बलात्काराचा गुन्हा

इचलकरंजीच्या उद्योगपतीवर बलात्काराचा गुन्हा

इचलकरंजीच्या उद्योगपतीवर बलात्काराचा गुन्हा

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

इचलकरंजीतील पती व मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देवून बलात्कार केल्याप्रकरणी उद्योजक नितीन दिलीप लायकर (रा. साखरपे हॉस्पिटलजवळ) याच्यासह तिघावर गावभाग पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पीडित महिलेने तक्रार दिली असून याबाबत अद्याप कोणासही अटक केलेली नाही. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक गजेंद्र लोहार यांनी दिली.
संशयित लायकर यांने जूना चंदूर रोडवरील रिया अपार्टमेंटमध्ये, बादशहा पेट्रोलपंपाजवळील एका अपार्टमेंटमध्ये तसेच मुसळे हायस्कूलनजीक महिलेच्या भाड्याच्या घरात पीडित महिलेवर पती व मुलीस ठार मारण्याची धमकी देऊन मार्च 2019 ते 16 जून 2019 या कालावधीत बलात्कार केला.
ऑक्‍टोबर 2019 मध्ये पीडित महिलेला मोबाईलवरून पती व मुलीस ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर 13 डिसेंबर 2019 रोजी पीडित महिलेला मोबाईलवर कॉल करून कुपवाड, सांगली येथील प्लॉट आपल्या नावावर करण्याची करण्याची मागणी केली. तसे न केल्यास सांगलीतील गुंड तुमचा गेम करणार असल्याची धमकी दिली.
दरम्यान, 5 ऑगस्टला रात्री 10.30 वाजता काळ्या ओढ्यानजिक दोन अनोळखींनी हातामध्ये चाकू घेऊन पीडित महिला व तिच्या पतीला अडवले. नितीन लायकर विरोधात पोलिसांत तक्रार केल्यास अश्‍लील चित्रफीत व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दोघांनी दिली. त्यानंतर तेथून ते निघून गेले.
याबाबत पीडित महिलेने गावभाग पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी नितीन लायकरसह दोन अनोळखींवर विविध चार कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. अद्याप याबाबत कोणासही अटक केलेली नाही. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. लोहार करीत आहेत.

anews Banner

Leave A Comment