Home पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये, आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकरशेठ जगताप यांनीही...

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये, आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकरशेठ जगताप यांनीही केले स्वागत … मराठीत भाषण करत जिंकली उपस्थितांची मनं

112

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220614-WA0048.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये, आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकरशेठ जगताप यांनीही केले स्वागत … मराठीत भाषण करत जिंकली उपस्थितांची मनं                                                पुणे/देहू,(उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार गिरीष बापट यांनी विमान तळावर स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देहूत आले त्यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकरशेठ जगताप, माजी आमदार बाळा भेगडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात केली. श्री विठ्ठलाय नमः असा जयघोष करत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या असं म्हणत त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली.
सुरक्षेच्या कारणास्तव या सभेला उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांना व्हीआयपी पास देण्यात आले होते. याशिवाय कडक तपासणी करूनच वारकऱ्यांना सभास्थळी सोडण्यात येत होते. मुख्य मंडपात आणि दोन उपमंडपात मिळून सुमारे दहा हजारांहून अधिक लोकांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती. पुरुष वारकरी पेहरावात दिसत असून त्यांच्या डोक्यावर गांधी टोपी, भगवी टोपी आणि भगवे फेटे लावलेले दिसत होते.
दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते देहूतील शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी वारकऱ्यांशी संवादही साधला. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे देहूत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील श्री क्षेत्र देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आले होते. त्यानिमित्ताने पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी संत तुकाराम महाराज देवस्थानाने केली होती. पंतप्रधानांचा सत्कार करण्यासाठी उपरणे, पगडी, टाळ, चिपळ्या, तुळशीची माळ आणि वीणा भेट देऊन नितीन महाराज मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिकृती देण्यात आली.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणाआधी देवेंद्र फडणवीस यांनी सभेला संबोधित करत, हा सोहळा आपल्यासाठी आनंदाचा आहे. संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी मोदी आले आहेत. त्याचे मी स्वागत करतो. उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

Previous articleअखेर लाचखोर तलाठी, युवराज रामभाऊ मासुऴे सुमारे दोन हजाराची लाच घेतांना जेरबंद!!
Next articleमुक्रमाबाद येथे राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब गरजु मातांना साडी चोळी चा वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.