Home गुन्हेगारी अखेर लाचखोर तलाठी, युवराज रामभाऊ मासुऴे सुमारे दोन हजाराची लाच घेतांना जेरबंद!!

अखेर लाचखोर तलाठी, युवराज रामभाऊ मासुऴे सुमारे दोन हजाराची लाच घेतांना जेरबंद!!

77
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220614-WA0036.jpg

अखेर लाचखोर तलाठी, युवराज रामभाऊ मासुऴे सुमारे दोन हजाराची लाच घेतांना जेरबंद!!
नांदगाव,(आनिल धामणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) – नांदगावचे महसूल खाते हे भ्रष्ट्राचारासाठी प्रसिद्ध असून, येथे वाढलेल्या लाचखोरांची लाच मागण्याचे धाडस मोठया प्रमाणावर वाढले आहे.हे आजच्या प्रकरणावरुन दिसुन येत आहे. विशेष बाब म्हणजे वडिलोपार्जित जमिन,नावावर करणे ,वारस लावणे हक्क ,सोड करणे या सर्व प्रकरणाचे,दर खाल पासुन तर वर पर्यंत ठरले आहे नांदगांव तालुका हा दुष्काऴी, तालुका म्हणून प्रसिद्ध आहे महसुल अधिकारी,तरीपण शेतकरी राजा जो जगाचा पौशिंदा म्हटले जाते,त्या शेतकरी वर्ग ची,मोकाट पैसे वसुल करुन राजरोस लुटमार करीत आहेत. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे नांदगांव मंडल अधिकारी, युवराज रामभाऊ मासुऴे,हे राजरोस लाच घेतांना आज रंगेहाथ पकडले गेले असुन , लाचलुचपत,प्रतिबंधक विभागाचे,उपविभागिय अधिकारी नरेंद्र पवार, पोलिस हवालदार प्रकाश डोंगरे पोलिस नाईक प्रणय इंगऴे, सहभागी झाले होते,खात्याचे,धाडसत्र होऊनही लाच मागणेही कुठे थांबलेले नाही हे आज झालेल्या नांदगाव तलाठ्यावरील कारवाईमुळे पुढे आले आहे.
तलाठी कार्यालय ,जुने तहसील कार्यालय,सर्वपरिचित आहे आणि त्यात चालणारे गैरव्यवहारही!पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी? असा प्रश्न असतो आणि तो आज एका धाडसी व्यक्तीच्या धाडसी तक्रारीची दखल घेत एसीबीने टाकलेल्या धाडीमुळे यशस्वी झाल्यामुळे येथील तलाठी युवराज रामभाऊ,मासुळे २००० रु ची लाच घेताना पकडला गेल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असून यात महसूल मधील अधिक लाचखोर बोके सापडून त्यांवर कारवाई होऊन तालुक्यात वाढलेली लाचखोरी थांबावी असे सुज्ञ नांदगावकरांकडून बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here