*पेठ वडगांव मधे आज ११ कोरोना पाँझिटीव्ह*
कोल्हापूर( मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहारात कोरोना पाँझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढतच चालली असुन आज दिवसभरात ११कोरोना पाँझिटीव्ह रूग्ण सापडले असुन तसेच एकूण रूग्णांची संख्या ५६ झालेली आहे.
लहान मुलांनी आणि ६० वर्षावरील नागरिकांनी घराबाहेर पडुनये
अथवा बाहेर गावी प्रवास करू नये .
शहरातील पॉझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले किंवा
क्वारंटाईन केलेल्या नागरीकांनी घराबाहेर पडणेचे नाही.
नागरीकांनी मास्क, हॅन्डग्लोज व सँनीटायजरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्स ठेवावा.
असे आवाहन नगराध्यक्ष श्री. मोहनलाल माळी,
उपनगराध्यक्ष श्री. शरद पाटील,
तसेच वडगांव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ.सुषमा शिंदे (कोल्हे ) यांनी केले.
