• Home
  • शेतकऱ्यांनो बातमी तुमच्यासाठी ! वरदायी ‘किसान रेल्वेचे भाडे ,जाहीर, वेळही निश्चित

शेतकऱ्यांनो बातमी तुमच्यासाठी ! वरदायी ‘किसान रेल्वेचे भाडे ,जाहीर, वेळही निश्चित

शेतकऱ्यांनो बातमी तुमच्यासाठी ! वरदायी ‘किसान रेल्वेचे भाडे ,जाहीर, वेळही निश्चित

प्रतिनिधी= किरण अहिरराव

नाशिक रोड : शेतकऱ्यांसाठी वरदायी असलेल्या किसान रेलची भाडेनिश्‍चिती करण्यात आली आहे. ७ ऑगस्टपासून किसान रेल पार्सल गाडी सुरू करण्यात आली आहे. ही गाडी आठवड्यातून एक दिवस देवळाली ते दानापूर चालवली जाणार आहे.या किसान रेल चे भाडे आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. एकदा वाचाच ​

किसान रेल चे भाडे जाहीर, वेळही निश्चित ​

प्रत्येक शुक्रवारी सकाळी अकराला देवळाली रेल्वेस्थानकावरून सुटेल व दुसऱ्या दिवशी शनिवार दानापूरला सायंकाळी १८.४५ वाजता पोचेल. तसेच दानापूर ते देवळाली ही गाडी प्रत्येक रविवारी दानापूरस्थानकाहून दुपारी १२ वाजता प्रस्थान करून सोमवारी ७.४५ वाजता देवळालीला पोचेल

आगमन, ११.३० प्रस्थान, मनमाड येथे १२.३५ आगमन, १२.५५ प्रस्थान, जळगाव येथे १४.५५ आगमन, १५.१५ प्रस्थान, भुसावळ- १५.४५ आगमन, १६.०५ प्रस्थान, बुऱ्हाणपूर- १७.०० आगमन, १७.२० प्रस्थान, खांडवा- १८.४० आगमन, १९.०० प्रस्थान करेल. इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्यायनगर आणि बक्सर याठिकाणी नियोजित थांबे देण्यात आले आहेत.

> क्रूर नियती! “बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले” वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

प्रमुख स्थानकाचे शुल्क असे (प्रतिटन भाडे)
१) नाशिक रोड/देवळाली ते दानापूर : रुपये ४,००१ प्रतिटन भाडे
२) मनमाड ते दानापूर : रुपये ३,८४९ प्रतिटन भाडे
३) जळगाव ते दानापूर : रुपये ३,५१३ प्रतिटन भाडे
४) भुसावळ ते दानापूर : रुपये ३,४५९ प्रतिटन भाडे
५) खांडवा ते दानापूर : रुपये ३,१४८ प्रतिटन भाडे

> थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

anews Banner

Leave A Comment