• Home
  • 🛑असा होणार गणेशोत्सव साजरा – विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम ! 🛑

🛑असा होणार गणेशोत्सव साजरा – विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम ! 🛑

🛑असा होणार गणेशोत्सव साजरा – विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम ! 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 12 ऑगस्ट : ⭕ एक प्रभाग, एक गणपती अशी संकल्पना मांडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना के/ पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी आवाहन केल्यानंतर त्यांना मंडळांकडून काही प्रमाणात प्रतिसाद लाभताना दिसत आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळांनी यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याची तयारी दर्शवली आहे. या विभागात मागील वर्षी ८८ मंडळांनी सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. त्यातील ३२ मंडळांनी यंदा उत्सव साजरा न करण्याची तयारी दर्शवली आहे. तर काही मंडळांनी दीड ते सात दिवस उत्सव करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आपल्या विभागातील किमान काही मंडळांचे मन वळवण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.

के-पश्चिम विभागात एकूण १३ नगरसेवक प्रभाग असून या सर्व प्रभागात प्रत्येक नगरसेवकांमागे एक याप्रमाणे कृत्रिम तलावांची उभारणी केली जाणार आहे. एक प्रभाग एक सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले असले तरी नैसर्गिक विसर्जन स्थळांवर गर्दी होऊ नये म्हणून कृत्रिम तलावांची संख्याही वाढवण्यात येत असून एक नगरसेवक, एक कृत्रिम तलाव ही संकल्पना राबवून जास्तीत जास्त कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिली जातील, असे मोटे यांनी स्पष्ट केले.⭕

anews Banner

Leave A Comment